सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयीकेलेले अमूल्य मार्गदर्शन !

सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘मनातील विचार आणि बहिर्मुखता वाढू नये’, यासाठी साधकांनी स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाचे प्रयत्न वाढवणे आवश्यक आहे !

कु. श्रद्धा लोंढे : मधुमेह असलेल्या रुग्णाला त्याच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘इन्सुलिन’ घेणे आवश्यक असते. ते नसेल, तर साखरेचे प्रमाण नियंत्रणात रहात नाही.

कु. श्रद्धा लोंढे

त्याप्रमाणे स्वभावदोष-निर्मूलनासाठी सारणी लिखाण करणे अत्यावश्यक झाले आहे. ‘ते लिखाण झाले नाही, तर लगेच दुसर्‍या दिवशी मनातील विचार वाढतात आणि बहिर्मुखताही वाढते’, असे मला जाणवले. त्यामुळे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे महत्त्व माझ्या लक्षात आले. काही वर्षांपूर्वी माझ्या मनावर एवढा लगेच परिणाम होत नसे. आता प्रयत्न न झाल्यास माझ्या मनावर लगेच परिणाम होऊन मनातील विचार वाढतात. असे का होते ?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘काळाचा परिणाम’, हे याचे उत्तर आहे आणि ‘प्रयत्न वाढवणे’, हाच यावरील उपाय आहे.