कात्रज भागातील सराफी पिढीवर दरोडा टाकण्याच्या सिद्धतेतील चोरटे पोलिसांच्या कह्यात !
पुणे – कात्रज भागातील सराफी पिढीवर दरोडा टाकण्याच्या सिद्धतेत असणार्या चोरट्यांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. त्यांच्या समवेत असलेल्या ३ मुलांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. त्यांच्याकडून कोयते, दुचाकी, मिरची पूड जप्त केली आहे. यश बोरकर (वय १८ वर्षे), राजू कांबळे (वय १९ वर्षे), आर्यन काळे (वय १८ वर्षे) अशी कह्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी चेतन गोरे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. कात्रज गावातील गणेश मित्र मंडळाजवळ ही मुले थांबली असून त्यांच्याकडे कोयता, पालघन अशी शस्त्रे असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली होती. त्या अन्वये पोलिसांच्या पथकाने सापळा रचून तिघांना कह्यात घेतले. त्यांच्यासमवेत असलेले तिघे पळून गेले. (सापळा रचून कह्यात घेतांनाही तीघेजण पळून जात असतील, तर हे पोलिसांना लज्जास्पद आहे ! – संपादक) आरोपींचे साथीदार अल्पवयीन असून त्यांच्यापैकी एका विरुद्ध खूनाचा गुन्हा यापूर्वी नोंद झाला आहे. (अल्पवयीन मुलावर खूनाचा गुन्हा नोंद असून तो पुन्हा गुन्हा करत आहे, यातून गुन्हेगार पोलिसांचे भय नसल्याचा परिणाम ! यातून पोलीस काही शिकतील का ? – संपादक) पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी पुढील अन्वेषण करत आहेत.