ISKCON Monk Arrest Controversy : (म्हणे) ‘भारत चुकीचे तथ्य मांडत असून ही गोष्ट आमच्या मैत्रीच्या विरोधात !’ – बांगलादेश
बांगलादेशाकडून चिन्मय प्रभु यांच्या अटकेच्या संदर्भातील भारताच्या विधानावर आक्षेप
ढाका (बांगलादेश) – चिन्मय कृष्ण दास प्रभु यांच्या अटकेविषयी काही लोकांकडून चुकीची माहिती देण्यात आली आहे, हे अतिशय दुःखद आहे. भारत सरकारने यावर केलेली विधाने केवळ वस्तूस्थितीविषयी चुकीची माहिती देत नाहीत, तर दोन शेजारी देशांमधील मैत्री आणि परस्पर समंजसपणाच्या भावनेच्याही विरुद्ध आहेत, अशी प्रतिक्रिया बांगलादेशाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चिन्मय प्रभु यांच्या प्रकरणी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवर दिली आहे.
बांगलादेशाने पुढे म्हटले की, बांगलादेश सरकार पुन्हा सांगू इच्छित आहे की, देशाची न्यायव्यवस्था पूर्णपणे स्वतंत्र आहे अन् सरकार त्यांच्या कामकाजात हस्तक्षेप करत नाही. बांगलादेश सरकार देशात धार्मिक सलोखा राखण्यासाठी कटिबद्ध आहे. चितगावमधील अधिवक्ता सैफुल इस्लाम यांच्या निर्घृण हत्येबद्दल चिंता आहे. कोणत्याही परिस्थितीत धार्मिक सहिष्णुता कायम रहावी यासाठी प्रशासनाने सुरक्षा वाढवली आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेमुळे आम्ही चिंतेत आहोत. गुन्हेगार मुक्तपणे फिरत आहेत. हे दुर्दैवी असतांना शांततापूर्ण सभांद्वारे योग्य मागण्या मांडणार्या धार्मिक नेत्यावर खटले चालू आहेत.
संपादकीय भूमिकायाला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! चिन्मय प्रभु यांच्यावर देशद्रोहाचा खोटा गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात टाकणार्या बांगलादेशाला खडे बोल सुनावण्याचा भारताला अधिकार आहे. तेच भारताने केले. यावर बांगलादेशाला मिरच्या झोंबत असतील, तर भारताने आता पुढचे पाऊल उचलणे आवश्यक आहे ! |