Bangladesh Temple Attack : बांगलादेशामध्ये हिंदूंच्या ३ मंदिरांवर आक्रमण
चितगाव (बांगलादेश) – चिन्मय प्रभु यांच्या अटकेनंतर बांगलादेशात चालू असलेल्या धर्मांध मुसलमानांच्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर येथे २६ नोव्हेंबरला धर्मांध मुसलमानांनी ३ हिंदु मंदिरांना लक्ष्य केले. यात फिरंगी बाजारातील लोकनाथ मंदिर, श्री मनसामाता मंदिर आणि हजारी लेनमधील श्री कालीमाता मंदिर यांचा समावेश होता.
‘अल्लाहू अकबर’च्या (‘अल्ला महान आहे’ अशा) घोषणा देत धर्मांधांनी हे आक्रमण केले. या वेळी त्यांनी दलित वसाहतीत अनेक घरांनाही आग लावली. यापूर्वी त्यांनी परिसरातील हिंदूंना दुकाने बंद करण्याची धमकीही दिली होती. स्थानिक हिंदूंच्या म्हणण्यानुसार धर्मांध मुसलमान ‘इस्लामी जमात’ आणि बांगलादेश नॅशनल पार्टी या पक्षांशी संबंधित होते.