ISKCON Monk’s Lawyer Tragically Killed : चितगाव (बांगलादेश) येथे मुसलमान अधिवक्‍त्‍याची हत्‍या !

सरकारकडून चौकशीचा आदेश

अधिवक्‍ता सैफुल इस्‍लाम आरिफ

ढाका (बांगलादेश) – इस्‍कॉनचे सदस्‍य चिन्‍मय कृष्‍ण दास प्रभु यांना अटक झाल्‍यापासून बांगलादेशात हिंदूंकडून निदर्शने चालू आहेत. त्‍यावर धर्मांधांकडून आक्रमणे केली जात आहेत. चितगाव येथे अशाच एका आक्रमणाच्‍या वेळी अधिवक्‍ता सैफुल इस्‍लाम आरिफ यांची हत्‍या करण्‍यात आली. या हत्‍येमागील कारण अद्याप स्‍पष्‍ट झालेले नाही. या हत्‍येनंतर बार असोसिएशनने २७ नोव्‍हेंबरला न्‍यायालयीन कामकाज बंद ठेवले होते.

बांगलादेश सरकारचे मुख्‍य सल्लागार प्रा. महंमद युनूस यांनी अधिवक्‍ता सैफुल यांच्‍या हत्‍येचा निषेध करत चौकशीचा आणि कारवाई करण्‍याचा आदेश दिला आहे. त्‍यांनी लोकांना शांत रहाण्‍याचे आणि कोणत्‍याही अनुचित उपक्रमांमध्‍ये सहभागी न होण्‍याचे आवाहन केले. त्‍यांनी कायद्याची कार्यवाही करणार्‍या संस्‍थांना शहरातील सुरक्षा वाढवण्‍याचे आदेशही दिले आहेत.

अधिवक्‍ता संघटनेकडून हिंदूंवर हत्‍येचा आरोप

चितगाव अधिवक्‍ता संघटनेचे अध्‍यक्ष नाझिम उद्दीन चौधरी यांनी आरोप केला की हिंदु आंदोलकांनी सैफुल यांना खोलीमध्‍ये पकडून त्‍यांची हत्‍या केली.