Bangladesh ISKCON Ban Demand : बांगलादेशात ‘इस्‍कॉन’वर बंदी घालण्‍यासाठी उच्‍च न्‍यायालयात मागणी !

  • न्‍यायालयाकडून या प्रकरणाची चौकशी करण्‍याचा सरकारला आदेश

  • इस्‍कॉन ‘कट्टरतावादी संघटना’ असल्‍याचे बांगलादेश सरकारचे न्‍यायालयात विधान

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात ‘इस्‍कॉन’वर बंदी घालण्‍यासाठी उच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट (दाखल) करण्‍यात आली आहे. एका अधिवक्‍त्‍याकडून ही याचिका प्रविष्‍ट करण्‍यात आली आहे. बांगलादेश सरकारने ‘इस्‍कॉन’ ही धार्मिक कट्टरतावादी संघटना आहे’, असे म्‍हटले आहे. त्‍यानंतर ही याचिका प्रविष्‍ट करण्‍यात आली. यानंतर न्‍यायालयाने सरकारला चौकशी करण्‍याचा आदेश दिला आहे.

१. न्‍यायालयाने महाधिवक्‍त्‍यांकडून ‘इस्‍कॉन’विषयी आणि ‘बांगलादेशात त्‍याची स्‍थापना कशी झाली ?’, याबद्दल जाणून घेण्‍याचा प्रयत्न केला. प्रतिसादात महाधिवक्‍त्‍यांंनी सांगितले की, ही संस्‍था राजकीय पक्ष नाही. ही एक धार्मिक कट्टरतावादी संघटना आहे. याबाबत सरकार चौकशी करत आहे.

२. उच्‍च न्‍यायालयाने महाधिवक्‍त्‍यांंना इस्‍कॉनविषयी सरकारची भूमिका आणि देशातील कायदा अन् सुव्‍यवस्‍थेचा अहवाल २८ नोव्‍हेंबरला सकाळपर्यंत देण्‍याचे निर्देश दिले.

३. देशांतील शहरांमध्‍ये चिन्‍मय प्रभु यांच्‍या अटकेच्‍या विरोधात निदर्शने होत असल्‍याने कोणतीही अनुचित परिस्‍थिती टाळण्‍यासाठी चितगाव आणि रंगपूर येथे आणीबाणी लागू करण्‍याचे निर्देश देण्‍याची मागणीही याचिकेत करण्‍यात आली आहे. न्‍यायालयाने सरकारला याबाबत तातडीने निर्णय घेण्‍याचे निर्देश दिले आहेत.

४. इस्‍कॉनचे सदस्‍य चिन्‍मय प्रभु यांना अटक केल्‍यापासून बांगलादेशात हिंदूंकडून निदर्शने करण्‍यात येत आहेत. त्‍यावर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमणे केली जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर इस्‍कॉनने बांगलादेश सरकारचा निषेध करणारे निवेदन प्रसारित केले होते.

संपादकीय भूमिका

  • ‘जमात-ए- इस्‍लामी’ या जिहादी पक्षावरील बंदी हटवणार्‍या बांगलादेशातील अंतरिम सरकारने ‘इस्‍कॉन’ला ‘कट्टरतावादी संघटना’ म्‍हणणे आश्‍चर्यजनक म्‍हणता येणार नाही ! सध्‍या बांगलादेशात जिहादी मानसिकतेचे लोक सत्तेत असल्‍याने तेथे हिंदूंच्‍या संघटनांची ही स्‍थिती होणारच आहे. इतकेच नाही, तर हिंदूंचा वंशसंहार होणार हेही तितकेच खरे आहे. आता जगभरातील हिंदू ‘एक हैं तो सेफ हैं’साठी  (‘संघटित राहिलो, तर सुरक्षित राहू’साठी) काय करणार आहेत ?, हेच पहावे लागेल !
  • भारताच्‍या ठिकाणी इस्रायल असता आणि हिंदूंच्‍या ठिकाणी ज्‍यू असते, तर एव्‍हाना बांगलादेशातील धर्मांधांचा गाझा पट्टीप्रमाणे सर्वनाश झाला असता, हेही तितकेच खरे ! धर्मबांधवांचे रक्षण कसे करावे, हे इस्रायलच्‍या ज्‍यूंकडूनच शिकावे !