अपूर्ण कामाचे पूर्ण देयक घेण्याचा प्रयत्न करणारे २ अभियंते निलंबित !

नवी मुंबई – नेरूळ येथील सायकल ट्रॅक बनवण्याचे काम अपूर्ण असतांना त्या कामाचे ठेकेदाराला पूर्ण देयक देण्यास सांगणार्‍या २ अभियंत्यांना निलंबित करण्यात आले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी ही कारवाई केली. उपअभियंता किशोर अमरनानी आणि कनिष्ठ अभियंता विनोद जैन अशी त्यांची नावे आहेत. ११ कोटी रुपये खर्चाच्या या कामाचे अंतिम देयक ५ कोटी रुपये इतके होते.

संपादकीय भूमिका :

अशा कर्तव्यचुकारांवर कठोर कारवाईच हवी !