राज्यघटनेचे पहिल्यापासूनचे २ शत्रू, म्हणजेच साम्यवादी आणि समाजवादी ! – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
‘‘कम्युनिस्ट’ (साम्यवादी) आणि ‘सोशालिस्ट’ (समाजवादी) हे २ गट राज्यघटनेचा धिक्कार करत आहेत. हे दोघे राज्यघटनेचा निषेध कशाविषयी करत आहेत ? यांच्या निषेधाचे कारण राज्यघटना वाईट आहे, असे आहे काय ? मी आत्मविश्वासाने सांगतो, ‘नाही’. ते खरे कारण नाही. कम्युनिस्टांना हुकूमशाही हवी आहे. (dictatorship of the proletariat.) आपली राज्यघटना संसदीय लोकशाहीवर अवलंबून आहे; म्हणून कम्युनिस्ट त्याचा धिक्कार करत आहेत. सोशालिस्टांना २ गोष्टी हव्या आहेत. (१) जर सत्तेत आले, तर भरपाई न देता खासगी मालमत्तेचे सरकार दरबारी विलीनीकरण करण्याची आझादी (स्वातंत्र्य) अथवा (२) जर सत्तेत नाही आले, तर त्यांना टीका करण्याची आझादी हवी आहे वा शासन संस्था (स्टेट) उलथवून टाकण्याची आझादी हवी आहे. त्यासाठी त्यांना निरंकुश आझादी (freedom) आणि अमर्याद अधिकार घटनेत घालून हवे आहेत.’ (२५ नोव्हेंबर १९४९ या दिवशी ‘संविधान सभे’समोर डॉ. आंबेडकर यांनी केलेले भाषण)
संग्राहक : श्री. सिद्धराम पाटील, उपसंपादक, दैनिक ‘दिव्य मराठी’, सोलापूर.
(साभार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग ३, पृष्ठ क्र. १६६)
संपादकीय भूमिका‘भाजप राज्यघटना पालटणार आहे’, असे म्हणणारे हे वाचतील का ? |