आळंदी येथील वारकरी अधिवेशनात वारकर्‍यांचा ‘धर्मजागर’ करण्‍याचा एकमुखी निर्धार !

व्‍यासपिठावर आसनावर बसलेले मध्‍यभागी प.पू. गोविंददेव गिरि महाराज, त्‍यांच्‍या शेजारी पू. अमृताश्रम स्‍वामी महाराज (दंडी स्‍वामी) आणि अन्‍य संत, मान्‍यवर

आळंदी (जिल्‍हा पुणे) – हिंदु धर्मावर होत असलेल्‍या विविध आघातांच्‍या विरोधात, तसेच हिंदूंमध्‍ये जागृती करण्‍यासाठी धर्मजागर करण्‍याचा एकमुखी निर्धार आळंदी येथील वारकरी अधिवेशनात करण्‍यात आला. २६ नोव्‍हेंबरला श्री देविदास धर्मशाळा तथा वै. मामासाहेब दांडेकर स्‍मृती मंदिर, गोपाळपुरा, आळंदी येथे हे १८ वे वारकरी अधिवेशन पार पडले. हिंदु जनजागृती समिती, राष्‍ट्रीय वारकरी परिषद आणि वारकरी संप्रदाय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने पू. अमृताश्रम स्‍वामी महाराज (दंडी स्‍वामी) यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या या अधिवेशनात नामवंत संत-महंत, मान्‍यवर, ह.भ.प., धर्माचार्य, हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे प्रमुख यांनी मार्गदर्शन केले.