साधिकेच्या मनाची स्थिती नकारात्मक झाली असतांना वेळोवेळी तिला पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांचे साहाय्य मिळणे

१. साधिकेच्या मनाची स्थिती नकारात्मक झाली असतांना पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी अकस्मात भ्रमणभाषद्वारे तिची चौकशी केल्यावर साधिकेचे मन शांत होणे 

पू. (सौ.) अश्‍विनी पवार

‘ऑक्टोबर २०२२ मध्ये मी दिवाळीनिमित्त गावी गेले होते. तेव्हा काही दिवसांनी माझ्या मनात स्वतःविषयी नकारात्मक विचार येऊ लागलेे. त्या विचारांविरुद्ध लढण्याचा मी काही प्रमाणात प्रयत्न करत होते. तेव्हा ‘माझ्या मनाची स्थिती पू. (सौ.) अश्‍विनीताई (सनातन संस्थेच्या ६९ व्या समष्टी संत पू. [सौ.] अश्‍विनी अतुल पवार, वय ३५ वर्षे) यांच्यापर्यंत पोचत आहे आणि माझी स्थिती केवळ त्याच जाणू शकतात’, असे विचार माझ्या मनात सतत येत होते. त्याच वेळी मला पू. (सौ.) अश्‍विनीताईंचा ‘मी कशी आहे ?’ याची चौकशी करण्यासाठी भ्रमणभाष आला. त्या वेळी मी त्यांना माझ्या मनाची स्थिती मोकळेपणाने सांगितली. त्यानंतर मला नकारात्मक विचारांतून लगेचच बाहेर पडता आले.

२. साधिकेच्या मनातील विचारांकडे पू. (सौ.) अश्‍विनीताईंचे लक्ष असल्याचे जाणवून त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटणे 

सौ. लक्ष्मी पाटील

पू. ताईंविषयी मी असे अनेक वेळा अनुभवले आहे. कधी माझी स्थिती ठीक नसेल, मनात कोणत्याही प्रकारचा संघर्ष होत असेल, तेव्हा पू. ताईंना ते कळते. जणूकाही माझ्या मनातील विचारांकडे पू. ताईंचे लक्ष असते. त्या वेळी मला पुष्कळ कृतज्ञता वाटते.

३. सनातनचे संत आणि उत्तरदायी साधक यांनी सनातनच्या साधकांचे आईप्रमाणे पालकत्व स्वीकारले असणे 

व्यवहारात जसे बाळाला काही दुखत असल्यास किंवा ठेच लागल्यास त्याची त्याच्या आईला जाणीव होते, तसे सनातनचे संत आणि उत्तरदायी साधक यांनी सनातनच्या साधकांचे पूर्ण पालकत्व स्वीकारले आहे. त्यामुळे साधकांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर कोणताही त्रास होत असल्यास त्यांना न सांगताही लगेच कळते अन् ते आपल्याला अपेक्षित असे साहाय्य करून त्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतात.

पू. (सौ.) अश्‍विनीताई यांनी मला विचारांतून बाहेर येण्यासाठी साहाय्य केल्यामुळे त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. लक्ष्मी नारायण पाटील (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ३४ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. २१.१२.२०२२)