पाकिस्तानात इम्रान खान समर्थकांची हिंसक निदर्शने : ६ सैनिकांचा मृत्यू !
इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेच्या मागणीसाठी रविवारी पाकिस्तानात चालू झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. इम्रान खान यांचे शेकडो समर्थक इस्लामाबादमध्ये दाखल आले आहेत. या आंदोलकांनी सुरक्षादलांवर आक्रमण केले. या आक्रमणात ६ सैनिकांचा चिरडून मृत्यू झाला. या घटनेत ५ सैनिक आणि २ पोलीस घायाळ झाले आहेत.
हिंसाचार रोखण्यासाठी राजधानी इस्लामाबादमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. आंदोलकांना दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आंदोलकांची राजधानी इस्लामाबादच्या दिशेने वाटचाल चालू आहे. डी चौकात जाऊन आंदोलन करण्याचा त्यांचा उद्देश आहे. आंदोलकांनी या भागात घुसू नये यासाठी सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. इम्रान खान रावळपिंडीच्या अदियाला कारागृहात बंद आहे.