पुणे येथे विद्या विकास विद्यालय प्रशाला येथे शिक्षक कार्यशाळा !

सनातन धर्माचे ४० दुर्मिळ ग्रंथ संस्थेला भेट !

डॉ. राम तपस्वी यांचा सत्कार करतांना विंग कमांडर श्री. विनायक डावरे (निवृत्त) (उजवीकडे)

पुणे – सहकारनगर येथे ‘संस्कृत विद्या मंदिरा’च्या विद्या विकास विद्यालय प्रशाला येथे २५ नोव्हेंबर या दिवशी ‘शिक्षक विद्यार्थी सुसंवाद समुपदेशन’ या विषयावर शिक्षक कार्यशाळा पार पडली. एन्.एल्.पी. (न्यूरो-लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग) प्रशिक्षक सौ. रविबाला काकतकर यांनी अध्यापकांचे समुपदेशन केले. विंग कमांडर विनायक डावरे (निवृत्त) हे कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी डॉ. हिमांशू नवांगुळ आणि डॉ. राम तपस्वी समारंभास उपस्थित होते. अध्यापकांच्या अभ्यासासाठी डॉ. राम तपस्वी यांनी ४ वेद, सर्व उपनिषदे, ६ दर्शने, १८ पुराणे असे सनातन धर्माचे ४० दुर्मिळ ग्रंथ या संस्थेला भेट दिले.

(डावीकडून) रजनी आंबर्डेकर, सौ. रविबाला काकतकर, श्री. डावरे (सत्कार करतांना) आणि डॅा. हिमांशू नवांगुळ
(डावीकडून) रजनी आंबर्डेकर, सौ. रविबाला काकतकर, श्री. डावरे (सत्कार करतांना) आणि डॅा. हिमांशू नवांगुळ, श्री विनायक जांभोरकर
अध्यापकांचे समुपदेशन करताना सौ. रविबाला काकतकर