जर्मनीच्या स्लेस्विग-होल्स्टेन प्रांताच्या संसदेत पहिल्यांदाच साजरी झाली दिवाळी !
बर्लिन (जर्मनी) – जवळपास महिनाभरानंतर जर्मनीच्या स्लेस्विग-होल्स्टेन प्रांताच्या संसदेत पहिल्यांदाच दिवाळी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात भारतीय समाजातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमात भारतीय समाजातील विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या कार्यक्रमात भारतीय समुदायाचे नेते राकेश वेऊली सहभागी झाले होते, तसेच उप वाणिज्यमंत्री ज्युलिया कार्टसेन आणि ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन (सीडीयू) पक्षाचे अनेक नेते अन् स्थानिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. या सर्वांनी जर्मनीच्या विकासात भारतीय समुदायाच्या योगदानाचे कौतुक केले.