Eknath Shinde Resigned : एकनाथ शिंदे यांनी दिले मुख्‍यमंत्रीपदाचे त्‍यागपत्र !

मुख्‍यमंत्रीपदाचा राजीनामा सादर करतांना एकनाथ शिंदे, समवेत अन्‍य मंत्री

मुंबई – एकनाथ शिंदे यांनी २६ नोव्‍हेंबर या दिवशी राजभवन येथे मुख्‍यमंत्रीपदाचे त्‍यागपत्र राज्‍यपाल सी.पी. राधाकृष्‍णन् यांच्‍याकडे सुपूर्द केले. या वेळी मुख्‍यमंत्र्यांसमवेत  अजित पवार, देवेंद्र फडणवीस हेही उपस्‍थित होते.

महाराष्‍ट्राच्‍या विधानसभेचा ५ वर्षांचा कार्यकाळ २६ नोव्‍हेंबर या दिवशी समाप्‍त झाल्‍याने राज्‍यपालांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्‍यागपत्र स्‍वीकारले आहे. राज्‍यात नवीन सरकार स्‍थापन होईपर्यंत राज्‍याचा कार्यभार पहाण्‍यासाठी ‘काळजीवाहू मुख्‍यमंत्री’ म्‍हणून नियुक्‍ती करत असल्‍याचे पत्र या वेळी राज्‍यपालांनी एकनाथ शिंदे यांच्‍याकडे सुपूर्द केले. शपथविधी होऊन नवीन सरकार स्‍थापन होईपर्यंत एकनाथ शिंदे ‘काळजीवाहू मुख्‍यमंत्री’ म्‍हणून राज्‍याचा कारभार पहातील.