Bill Clinton On India : (म्हणे) ‘भारतात गांधींचे स्वप्न साकार होण्याविषयी साशंक !’ – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन
वॉशिंग्टन (अमेरिका) – भारतातील अंतर्गत विशेषतः हिंदू आणि मुसलमान यांच्यातील मतभेदांचा संदर्भ देतांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन म्हणाले की, भारतात गांधींचे स्वप्न साकार होण्याविषयी साशंकता व्यक्त केली. ७८ वर्षीय क्लिंटन यांनी ‘सिटीझन : माय लाइफ आफ्टर द व्हाईट हाऊस’ या त्यांच्या नवीन पुस्तकात ही टिपणी केली आहे. गेल्या आठवड्यात या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. आज भारताचा झपाट्याने विकास होत आहे आणि लोक त्याचा आनंद घेत आहेत. तो सर्वाधिक लोकसंख्या असलेला देशही बनला आहे. असे असले, तरी तेथील अंतर्गत मतभेदांमुळे विशेषतः हिंदू आणि मुसलमान यांच्यातील भेदांमुळे गांधींचे स्वप्न साकार होणार का, याविषयी साशंकता आहे, असे त्यांनी पुस्तकात म्हटले आहे.
वर्ष २००१ च्या विनाशकारी भूकंपानंतर त्यांनी केलेल्या गुजरात दौर्याचेही या पुस्तकात विविरण आहे. क्लिंटन यांच्या म्हणण्यानुसार भारतात गेल्यानंतर त्यांनी अहमदाबादमधील रुग्णालय आणि गांधी आश्रम यांना भेट दिली होती आणि काही तरुणांशी संवाद साधला होता. अमेरिकेत त्यांनी त्यांच्या काही भारतीय-अमेरिकन मित्रांसह ‘अमेरिकन इंडिया फाउंडेशन’ची (ए.आय.एफ.) स्थापना केली आणि भूकंपग्रस्तांसाठी कोट्यवधी डॉलर्स जमा केले होते.
भारतभेटीत त्यांनी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भेट घेऊन भूकंपग्रस्थांना साहाय्य करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आपल्या मनात वाजपेयी सरकारविषयी खूप आदर होता, असे क्लिंटन यांनी म्हटले आहे.
संपादकीय भूमिकाअमेरिका वर्णद्वेषमुक्त होण्याचे स्वप्न अनेक अमेरिकी समाज धुरिणींनी गेली अनेक दशके पाहिले आहे. हे स्वप्न अमेरिकी समाज कशी साकारणार, याचे उत्तरही अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी दिला, तर बरे होईल ! |