185 Tons Cow Meat Seized : उत्तरप्रदेश पोलिसांकडून १८५ टन गोमांस जप्त : ९ जणांना अटक
अटक करण्यात आलेल्यांमध्ये शीतगृहाचे हिंदु मालक आणि काही हिंदु कर्मचारी यांचाही समावेश !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – पोलिसांनी काही दिवसांपूर्वी ग्रेटर नोएडामध्ये १८५ टन गोमांस जप्त केले आहे. एका कंटेनरमधून हे गोमांस उत्तरप्रदेशातील नोएडा येथे आणण्यात आले होते. ते शीतगृहात ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्याचा देहली आणि नंतर उत्तराखंडला येथे पुरवठा करणार येत असल्याचा आरोप आहे. ‘गोरक्षा हिंदु दला’चे राष्ट्रीय अध्यक्ष वेद नागर यांनी मात्र २५० टन गोमांस जप्त करण्यात आल्याचा दावा केला आहे.
लोणीचे भाजपचे आमदार नंद किशोर गुर्जर म्हणाले, ‘‘जप्त केलेल्या गोमांसाचे प्रमाण बघून किमान ८ सहस्र गायींची हत्या करण्यात आली आहे, असे लक्षात येते. लक्ष्मणपुरीमध्ये बसलेल्या २ मोठ्या अधिकार्यांचा यात सहभाग आहे.’’ गुर्जर यांनी त्यांची नावे उघड केली नाहीत. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ९ जणांना अटक केली आहे. शीतगृहावर बुलडोझर चालवण्याची आणि आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली आहे.
“8 हजार गायें बंगाल में काटीं…नोएडा में छिपाया मांस:* भैंस का मीट लिखकर सप्लाई; BJP विधायक बोले-लखनऊ के दो अफसर पैसा खा रहे”https://t.co/Zz6qCMUz7w
— Nand Kishor Gurjar (@nkgurjar4bjp) November 26, 2024
१. ही घटना नोएडातील दादरी परिसरात घडली. गोरक्षण संस्थेच्या सदस्यांना बंगालमधून गोमांस येत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून संस्थेचे सदस्य जमले. एच्.आर. ३८ ए. ई. ९१८५ हा नोंदणी क्रमांक असलेला ट्रक अडवण्यात आला आणि मांस सापडले. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली.
२. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गोमांस कह्यात घेतले आणि ते पडताळणीसाठी पाठवले. त्यात ही माहिती उघडकीस आली.
३. हा कंटेनर उत्तरप्रदेशातील एटा जिल्ह्यातील रहिवासी शिवशंकर चालवत होता. ट्रकचा चालकही त्याच जिल्ह्यातील होता. दोघांनाही अटक करण्यात आली आहे. चौकशीत त्यांनी हे मांस बंगालमधून आणल्याचे उघड केले.
४. हे गोमांस हबीबर मुल्ला नावाच्या व्यक्तीकडून घाऊक किमतीत खरेदी करण्यात आले होते. हे गोमांस गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील नागला किराणी गावातील एस्.पी.जे. शीतगृहात नेण्यात येत होते, असे ट्रकचालकाने सांगितले.
५. शीतगृहाचा मालक पूरन जोशी, संचालक महंमद खुर्शीदुन नबी आणि शीतगृहाचा व्यवस्थापक अक्षय सक्सेना, अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. या शीतगृहाला टाळे ठोकण्यात आले आहे. २३ नोव्हेंबर या दिवशी पोलिसांनी तस्करीमध्ये सहभागी असलेल्या देहलीचा रहिवासी असलेला सलिमुद्दीन अन्सारी यालाही अटक केली.
६. चौकशीच्या वेळी अविनाश कुमार, राकेश सिंह आणि शोएब हक्कानी यांचाही सहभाग आढळून आला. हे तिघेही ‘टोरो प्रायमरी प्रायव्हेट लिमिटेड’ नावाच्या कंपनीचे कर्मचारी आहेत. या कंपनीवर शीतगृहात साठवलेले गोमांस खरेदी-विक्री केल्याचा आरोप आहे. त्यांनाही अटक करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकागोमांसाची विक्री करण्यामध्ये हिंदूही गुंतले आहेत, यासारखी संतापजनक आणि लज्जास्पद गोष्ट ती कोणती ? |