पंढरपूर येथील निकालाच्या विरोधात मनसे याचिका प्रविष्ट करणार !
पंढरपूर – जनतेने वर्गणी गोळा करून मला उभे केले होते. मी गेल्या १५ वर्षांपासून काम करत असून निवडणुकीत मला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे पंढरपूर मतदारसंघात मला २ सहस्र ५६८ इतकी अल्प मते मिळू शकत नाहीत. त्यासाठी मी ‘व्हीव्हीपॅट’च्या चिठ्ठ्यांची पुन्हा मोजणी करण्याची मागणी केली होती. ही मागणी निवडणूक निर्णय अधिकार्यांनी मान्य केली नाही. त्यामुळे ‘इ.व्ही.एम्.’ यंत्रात गडबड असल्याचा संशय असल्याने मी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार आहे, असे विधान पराभूत झालेले मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी सांगितले. या मतदारसंघात भाजपचे समाधान अवताडे विजयी झाले आहेत.
दिलीप धोत्रे म्हणाले, ‘‘रेल्वे इंजिन’ला मतदान केल्याचे मतदार सांगत होता; पण निकाल धक्कादायक होता. याचा अर्थ ‘ई.व्ही.एम्.’ घोटाळा झाला आहे. त्यामुळे यंत्राच्या विरोधात मी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.’’