Andaman Drug Haul : अंदमान : मासेमारीच्या नौकेतून तब्बल ५ टन अमली पदार्थ जप्त !

तटरक्षक दलाची अमली पदार्थांच्या संबंधातील आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई !

नवी देहली – भारतीय तटरक्षक दलाने अंदमानजवळील समुद्रातून तब्बल ५ टन अमली पदार्थ जप्त केले आहेत. तटरक्षक दलाची अमली पदार्थांच्या संदर्भातील आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई आहे. मासेमारीच्या नौकेत हे अमली पदार्थ सापडले. पदार्थांचा प्रकार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात त्याचे मूल्य यांविषयी अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. प्रकरणाच्या चौकशीनंतरच कुणावर कारवाई करण्यात आली, हे स्पष्ट करू, अशी माहिती संरक्षण अधिकार्‍यांनी दिली.

भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात आतंकवाद विरोधी पथक यांनी १५ नोव्हेंबरला पोरबंदर किनार्‍यावरून ५०० किलो अमली पदार्थ जप्त केले होते. त्याचे मूल्य ७०० कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगण्यात आले होते.