Akola Police Attacked : पोलीस ठाण्याच्या अंमलदारांवर हात उगारून मुसलमानांकडून विजयाचा उन्माद साजरा !
|
अकोला, २५ नोव्हेंबर (वार्ता.) – विधानसभा निकाल घोषित होत असतांना काँग्रेसचे साजिदखान पठाण १ सहस्र २८३ मतांनी निवडून आल्याचे समजताच तेथील मुसलमानांनी रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या अंमलदारांवर हात उचलला. त्यांच्या अंगावरही ते सर्वजण धावून गेले. शेवटी अंमलदारांना धर्मांधांच्या तावडीतून वाचण्यासाठी एका घरात आश्रय घ्यावा लागला. या प्रकरणी सीसीटीव्हीमधील चित्रण पाहून ८ धर्मांधांना अटक करण्यात आली. तौफीक खान शब्बीर खान, महंमद अबुबखर रफीक कुरेशी, महंमद आदील खत्री महंमद अख्तर खत्री, इरशाद हुसेन लियाकत हुसेन, अब्दुल सादीक अब्दुल बशीर, अजीम खान इकबाल खान, जावेद खान जिलानी खान, सैयद अशरफ सैयद मकसूद अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाअशांवर पोलीस कधी वचक निर्माण करणार ? कायदाद्रोही आणि समाजद्रोही वर्तन करणार्या अशांना कारागृहातच डांबायला हवे ! |