पोलीस शिपायाला मारहाण करून पोलिसाचा गणवेश फाडणार्या मुसलमानावर गुन्हा नोंद !
मुंबई – वांद्रे रिक्लेमेशन परिसरात फिरण्यासाठी आलेल्या तरुणीचा पाठलाग करून तिचे चित्रण सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देणार्या बाबर रेहमत खान (वय ३४ वर्षे) याला पोलिसांनी अटक केली. त्याला वांद्रे पोलीस ठाण्यात आणल्यावर त्याने तेथे पोलिसांना शिवीगाळ आणि आरडाओरडा केला, तसेच पोलीस शिपाई गोराडे यांना मारहाण केली. या वेळी त्याने अन्य एका पोलिसाचा गणवेशही फाडला. खान याच्या विरोधात विनयभंग आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी खासगी सुरक्षारक्षक म्हणून काम करतो.
संपादकीय भूमिकापोलिसांवर हात उगारण्याचे, तसेच त्यांच्या गणवेशाला हात लावण्याचे मुसलमानांचे धाडस होतेच कसे ? पोलिसांचा काही वचक उरला नाही कि काय, असाच प्रश्न जनतेला पडतो ! |