प्रीती आणि समष्टीविषयी तळमळ असलेल्या संत पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार !
‘१५.११.२०२२ या दिवशी सत्संगात पू. (सौ.) अश्विनी पवार यांची वंदनीय उपस्थिती लाभली. त्या सत्संगात आम्हाला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांच्याविषयी आलेली अनुभूती येथे दिली आहे.
१. शिकायला मिळालेली सूत्रे
१ अ. सहजता आणि प्रीती : पू. अश्विनीताई सत्संगात येऊन बसल्या आणि आम्हा सर्वांना म्हणाल्या, ‘‘सर्वांना माझा भावपूर्ण नमस्कार !’’ त्यांच्या या बोलण्यामध्येच इतकी सहजता आणि प्रीती होती की, ते ऐकल्यावरच आम्हा सर्वांचा आनंद द्विगुणीत झाला.
१ आ. सतत शिकण्याच्या स्थितीत असणे : पू. अश्विनीताई संत असूनही आमच्यासारख्या लहान मुलांकडून शिकत होत्या. सत्संगातील साधक ‘ध्येयाच्या दृष्टीने काय प्रयत्न केले ?’, याचा आढावा सांगत होते. तेव्हा साधकांनी काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्र सांगितल्यानंतर त्या त्यांच्या वहीत लिहून घ्यायच्या. सत्संगाच्या शेवटी सर्वांनी प्रयत्नांच्या दृष्टीने ‘ध्येय’ सांगितले. तेव्हा तेही त्यांनी लिहून घेतले. यातून आम्हाला त्या ‘सतत शिकण्याच्या स्थितीत असतात’, हा गुण शिकायला मिळाला.
१ इ. समष्टीविषयी तळमळ : सत्संगात मी भावजागृतीचा प्रयोग घेत होते. भावजागृतीचा प्रयोग झाल्यानंतर त्यांनी आम्हाला विचारले, ‘‘भावजागृतीचा प्रयोग कुणाला अनुभवता आला नाही ? कुणाला ग्लानी येत होती ? कुणाला दाब जाणवत होता ?’’ नंतर त्या म्हणाल्या, ‘‘सत्संगातील भावजागृतीच्या प्रयोगामध्ये आत्यंतिक चैतन्य आहे. त्याचा लाभ होऊ नये, यासाठी वाईट शक्तींनी सत्संगात दाब आणि आवरण आणले. आता तुम्ही सत्संग चालू होण्यापूर्वी नियमित नामजपादी उपाय करा. त्यामुळे तुम्हाला या सत्संगांतील आत्यंतिक चैतन्याचा अधिकाधिक लाभ होईल.’’ या वेळी मला पू. ताईंमधील ‘समष्टीसाठीची तळमळ’ अनुभवता आली. त्यांनी आम्हाला असे अमूल्य मार्गदर्शन केल्यामुळे दुसर्या दिवसापासून आम्ही सत्संगात प्रतिदिन नामजपादी उपाय करतो आणि सत्संगाला आरंभ करतो. त्यामुळे आम्हाला सत्संगातील चैतन्याचा लाभ मिळत आहे.
२. पू. ताईंनी दैवी बालसाधकांना दिलेले ध्येय
पू. ताईंना हा दैवी सत्संग पाहून त्यांच्या गुरुकुलाची आठवण आली. त्या म्हणाल्या, ‘‘पूर्वी मी गुरुकुलात होते. तेव्हा प.पू. गुरुदेवांनी आम्हा सर्वांना विचारले, ‘आपल्याला कुणासारखे व्हायचे आहे ?’ त्यांच्या खोलीसमोर सुंदर पांढरी फुले होती. ‘त्यांच्यासारखे आनंदी व्हायचे आहे’, असे ते आम्हाला म्हणाले. त्यानंतर पू. ताई म्हणाल्या, ‘‘आज मला तुमच्या प्रत्येकामध्ये ते आनंदी फूल दिसत आहे. हा सत्संग खरंच दैवी आहे.’’ त्या वेळी ‘जे काही आहे, ते केवळ गुरुमाऊलीच्या अनंत कृपाशीर्वादानेच शक्य आहे’, असे मला जाणवले. पू. ताईंनी आम्हाला ‘आपल्याला गुरुदेवांना अपेक्षित असे ‘आनंदी साधक फूल’ बनायचे आहे’, असे सुंदर ध्येय दिले.
३. आलेली अनुभूती
३ अ. पू. अश्विनीताईंनी भ्रमणभाष हातात घेतल्यावर दैवी सुगंध येणे : सत्संगात काही साधक ‘ऑनलाईन’ जोडले होते. त्यामुळे भ्रमणभाषवर सत्संग चालू होता. पू. ताईंनी बोलण्यासाठी माझा भ्रमणभाष हातात घेतला. तेव्हा मला सूक्ष्मातून दैवी अत्तराचा सुगंध आला. तो सुगंध काही क्षणच होता; परंतु तो एखाद्या देवीच्या मंदिरातील सुगंधाप्रमाणे सुगंध होता.
४. प्रार्थना आणि कृतज्ञता
‘हे गुरुराया, पू. अश्विनीताईंच्या माध्यमातून तुम्हीच या सत्संगात आलात आणि आम्हाला भावामृत दिलेत. हे देवा, खरंच आपल्याला अपेक्षित असे ‘आनंदी साधक फूल’ आम्हाला बनता येऊन तुमच्या श्रीचरणी वाहता येऊ देत’, अशी आम्ही आर्तभावाने प्रार्थना करतो.’
– कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यायलय, गोवा. (२४.११.२०२२)
|