संपादकीय : मंदिरांच्या जागी मंदिरच हवे !
उत्तरप्रदेशातील काशी आणि मथुरा यांनंतर आता संभल गावातील जामा मशिदीच्या जागी मंदिर असण्याचा वाद वाढला आहे. दिवाणी न्यायालयाच्या आदेशाने संभल येथील शाही जामा मशिदीचे २४ नोव्हेंबरला सकाळी सर्वेक्षण करण्यात येत असतांना धर्मांध मुसलमानांनी हिंसाचार केला. या वेळी दगडफेक करण्यासह जाळपोळ करण्यात आली. यात ५ जणांचा मृत्यू झाला, तर २० पोलीस घायाळ झाले. सध्या येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुळात देशावर मोगलांनी आक्रमण केल्यानंतर देशातील अनेक मंदिरे पाडून तेथे मशिदी उभ्या करण्यात आल्या आहेत, हा इतिहास आहे. बाबरनामात हरिहर मंदिराचा उल्लेख आहे, त्याचा पुरावा राजपत्रातही आहे. ज्ञानवापी, मथुरा, वाराणसी, अयोध्या आणि आता जामा मशिदीत हिंदूंच्या मंदिरांचे अवशेष मिळाले आहेत. त्यामुळे तेथे पूर्वी हिंदूंची मंदिरे होती आणि ही मंदिरे पाडूनच तेथे मशिदी उभ्या केल्या आहेत, हे सिद्ध होते, तसेच याविषयी पुरातत्व विभागाकडे पुरावेही आहेत. असे असतांना संपूर्ण देशाचे इस्लामीकरण करण्याची ज्यांची योजना आहे, अशा धर्मांधांना हे पहावले नाही. त्यांच्या पोटात गोळा आला. वस्तूस्थिती समजून न घेता आता हेच धर्मांध, पोलीस आणि हिंदू यांच्यावर आक्रमण करून त्यांना घायाळ करत आहेत. यापूर्वी भारतीय पुरातत्व विभागाने ज्ञानवापी मशीद संकुलाचे सर्वेक्षण केले, तेव्हा तेथे हिंदु देवतांच्या मूर्तींसह एकूण ५५ दगडी शिल्पे सापडली. अयोध्या येथील जागेवर हिंदु मंदिराचे अवशेष सापडले आहेत. भारतीय पुरातत्व विभागाचे निवृत्त प्रादेशिक संचालक के.के. महंमद यांनी मशीद मंदिराच्या अवशेषांवर बांधल्याचा पुरावा मिळाल्यानंतर बाबरी मशीद परिसर हिंदूंच्या कह्यात देण्यास मुसलमानांना सांगितले होते. ‘हरिहर मंदिर हे आमचे मंदिर आहे’, हे संपूर्ण परिसरातील हिंदूंना ठाऊक आहे. हे लोकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. बाबरने अयोध्येचे श्रीराममंदिर आणि संभलचे हरिहर मंदिर पाडून त्यावर मशीद बांधली होती.
हरिहर मंदिर असण्याविषयी अनेक पुरावे !
संभल येथील केलादेवी मंदिराचे महंत ऋषिराज गिरी हे केवळ जामा मशिदीविषयी दावे करत नाहीत, तर ते आमचे मंदिर आहे आणि आमचेच रहाणार असल्याचे पूर्ण विश्वासाने सांगतात. येथे मंदिर असल्याची कोणतीही नोंद नाही. मंदिराचे दावे निराधार असल्याचे मुसलमान पक्षाचे म्हणणे आहे. जामा मशिदीच्या जागेवर मंदिर असल्याचा दावा हिंदु पक्ष बराच काळ करत आहे. १९ नोव्हेंबरला या प्रकरणाविषयी ८ जणांनी जिल्हा न्यायालयात जाऊन याचिका प्रविष्ट केली. त्यात सर्वोच्च न्यायालयाचे हिंदु पक्षाचे अधिवक्ता श्री. हरिशंकर जैन आणि त्यांचा मुलगा अधिवक्ता श्री. विष्णु शंकर जैन हे प्रमुख आहेत. हे दोघेही ताजमहाल, कुतुबमिनार, मथुरा, काशी आणि भोजशाळा यांची प्रकरणे हाताळत आहेत. याखेरीज याचिकाकर्त्यांमध्ये पार्थ यादव, केला मंदिराचे महंत ऋषिराज गिरी, महंत दीनानाथ, सामाजिक कार्यकर्ते वेदपाल सिंह, मदनपाल, राकेश कुमार आणि जीतपाल यादव यांची नावे आहेत. हिंदूंच्या बाजूचा दावा आहे की, या स्थानी श्री हरिहर मंदिर होते, जे बाबरने वर्ष १५२६ मध्ये पाडले आणि मशीद बांधली. हिंदु पक्षाने संभल न्यायालयात प्रविष्ट केलेल्या ९५ पानी याचिकेत २ पुस्तके आणि एका अहवालाचा आधार घेतला आहे. यामध्ये ‘बाबरनामा’, आईन-ए-अकबरी पुस्तक आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या (ए.एस्.आय.च्या) १५० वर्षे जुन्या अहवालाचा समावेश आहे.
प्रार्थनास्थळांचा कायदा रहित करा !
तत्कालीन पंतप्रधान दिवंगत नरसिंह राव यांच्या काँग्रेसच्या सरकारने प्रार्थनास्थळ (विशेष तरतुदी) अधिनियम, १९९१ अंतर्गत कायदा अस्तित्वात आणला. या कायद्यानुसार देशातील कुठल्याही प्रार्थनास्थळाची धार्मिक ओळख ही देशाच्या स्वातंत्र्यदिनी, म्हणजेच १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी जी होती, तीच कायम ठेवण्यात यावी. कुठल्याही प्रार्थनास्थळाचे रूपांतर करण्यास मनाई केली आहे. मुळात हा कायदा मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी चुकीच्या पद्धतीने बनवण्यात आला आहे. खरेतर देशात ज्या ज्या ठिकाणी मोठी मंदिरे होती, ती मंदिरे पाडून मोगलांनी तेथे मशिदी उभ्या केल्या आहेत. त्यामुळे यातून मशिदी वाचवण्यासाठी मुसलमानांनी मोठ्या युक्तीने काँग्रेसच्या सरकारला हा कायदा सिद्ध करण्यास भाग पाडले होते. केंद्र सरकारने हा कायदा रहित करून ‘ज्या गावातील मशिदींच्या ठिकाणी मंदिरांचे अवशेष मिळाले आहेत, तेथे मंदिरच उभे झाले पाहिजे’, असा कायदा संसदेतच करणे आवश्यक आहे; कारण हा प्रश्न केवळ उत्तरप्रदेशातील मंदिरांचा नाही. देशातील इतर राज्यांतही अशी परिस्थिती आहे. मंदिर असल्याचा पुरावा असल्याने त्यावर कुणीही आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही.
धर्मांधांचे लाड खपवून घेऊ नयेत !
१० वर्षांपूर्वी देशात काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे मशिदींवरील मंदिरांसाठी मोठ्या संख्येने कुणीही मंदिरासाठी दावा केला नाही; मात्र काळानुसार आता परिस्थिती पालटली आहे. त्यामुळे आता दावे प्रविष्ट होत आहेत. गेल्या ७० वर्षांत धर्मांधांनी लव्ह जिहाद, लँड जिहाद, वक्फ बोर्ड, धर्मांतर, गोहत्या, दंगली घडवून हिंदूंचे खच्चीकरण केले आहे. आता देशात अराजक माजवून भारताचे इस्लामीकरण करण्याकडे धर्मांधांची वाटचाल चालू आहे. त्यामुळे धर्मांध आणि त्यांची मालमत्ता यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याचे समजताच धर्मांध दंगली घडवून हिंदूंना मारहाण करतात. त्यांची संपत्ती लुटतात. केंद्र सरकारने या धर्मांधांचे लाड न करता त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी. हरिहर मंदिरासाठी काही संतांनी अनेक वर्षे लढा चालू केला आहे. हे आज नुकतेच जगासमोर आले आहे. याविषयी आता कायदेशीर लढाई चालू झाली आहे. या प्रकरणात जे काही पुरावे आहेत, ते न्यायालयात सादर केले आहेत. त्यामुळे मशिदीच्या जागी हरिहर मंदिर असल्याचे सिद्ध होत असल्याने मुसलमान पक्षाने हे मंदिर शांततेने हिंदूंच्या कह्यात देऊन ऐक्याचा आदर्श ठेवावा, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे.
हिंदूंनी संघटितपणे लढा द्यावा !
हिंदूंनीही संघटित होऊन मशिदींच्या तावडीतून मंदिरांची सुटका करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. वक्फ बोर्ड कायद्याद्वारे अनेक हिंदूंची भूमी, देवस्थाने अशांवर स्वतःचा अधिकार सांगण्यास मुसलमानांनी प्रारंभ केला आहे. महाराष्ट्रात हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीचे सरकार आले आहे. या सरकारसह हिंदूंनी संघटित होऊन हिंदूंची मंदिरे आणि त्यांची मालमत्ता कह्यात घेण्यासाठी शेवटपर्यंत लढा देणे आवश्यक आहे. यामध्ये हिंदू गाफील राहिले, तर आयुष्यभर हिंदूंवर पश्चाताप करण्याची वेळ येईल !
देशात हिंदू आणि मुसलमान यांच्यात तेढ निर्माण होण्यास काँग्रेसने मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी केलेला प्रार्थनास्थळ कायदाच उत्तरदायी ! |