व्रतांचा उद्देश
आपली सगळी व्रते संयमाचे शिक्षण देण्यासाठी निर्माण झाली, हे लक्षात येत नाही. ही व्रते चालू असतांनाच ती कधी संपायची, याची वाट पहाण्याची सवय लागली आहे. माणसाला काही सांगायची सोय नाही आणि तो काय करील, याचा नेम नाही. म्हणून शास्त्र म्हणते, ‘तुमची जी इंद्रिये आहेत, त्यांचे जे भोग आहेत, ते आवश्यक आहेत कि नाहीत ? प्रामाणिक आहेत कि नाहीत ?, याचा विचार करा आणि संयमाने भोगाचा स्वीकार करा.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
(साभार : ग्रंथ ‘ज्ञानकर्मसंन्यासयोग’)