सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया नवीन राजकीय पक्ष काढणार !
मुंबई – सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत. परिवर्तनासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. ‘तत्त्व सिद्धांत यावर काम करणारे लोक या पक्षात असतील. इथून तिथून उड्या मारणारे लोक यात नसतील’, असेही त्या म्हणाल्या.
त्यांनी सांगितले, ‘‘ग्रामपंचायत ते स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकीपासून आम्ही निवडणुका लढवणार आहोत. हा पक्ष नव्हे, ही क्रांती असणार आहे. हा सामान्यांचा पक्ष असेल.’’