‘इ.व्ही.एम्.’ विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार ! – डॉ. हुलगेश चलवादी, बहुजन समाज पक्षाचे उमेदवार

पुणे – राज्यातील प्रतिष्ठित लढत समजल्या जाणार्‍या वडगाव शेरी मतदारसंघात धक्कादायक निकाल समोर आले आहेत. ५० सहस्रांहून अधिकची हक्काची मते असूनही तेवढीही मते न मिळाल्याने इ.व्ही.एम्. यंत्रणेत घोळ असल्याचा आरोप वडगाव शेरी मतदारसंघातील बहुजन समाज पक्षाचे उमेदवार आणि प्रदेश महासचिव, पश्चिम महाराष्ट्र प्रभारी डॉ. हुलगेश चलवादी यांनी केला. इ.व्ही.एम्. यंत्रणेसंबंधी अनेक तक्रारी असूनही त्यावरच निवडणुकीचे चक्र अवलंबून असल्याने आता या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असून लवकरच जनहित याचिका न्यायालयात प्रविष्ट करणार असल्याची माहिती डॉ. चलवादींनी दिली आहे. वडगाव शेरी मतदारसंघात जवळपास १५० कोटी रुपयांचे वाटप झाल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.