सत्ता स्थापनेनंतर मशिदीवरील अनधिकृत भोंगे, मदरसे सहन करणार नाही ! – आमदार नितेश राणे, भाजप
मुंबई – महाराष्ट्रातील हिंदु समाजाने ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’, मशिदींवरील अनधिकृत भोंगे आणि अनधिकृत मदरसे यांविरोधात मतदान केले आहे. त्यामुळे सत्ता स्थापन झाल्यावर या अनधिकृत गोष्टी आम्ही सहन करणार नाही, अशी चेतावणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्रातील धर्मांधतेला दिली.
या वेळी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींपुढे नितेश राणे म्हणाले,‘‘सरकार स्थापन झाल्यावर दिवसातून ५ वेळा भोंगे आम्ही सहन करणार नाही. सत्ता स्थापन व्हायला ३-४ दिवस आहेत. त्यापूर्वीच मशिदींवरील अनधिकृत भोंगे आणि अनधिकृत दर्गे स्वत:हून हटवावेत. सत्ता स्थापन झाल्यावर आम्ही बुलडोझर फिरवला, तर मग आम्हाला दोष देऊ नका. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी हिंदुत्वाच्या विरोधात फतवे निघाले होते; परंतु महाराष्ट्रात फतवे नाहीत, तर भगवा चालला.’’