देयकाच्या नावात पालट करण्यासाठी लाच मागणारा कर्मचारी कह्यात !
पुणे – वीजदेयकावरील नावात पालट करण्यासाठी ८०० रुपयांची लाच घेणार्या महावितरणच्या धनकवडी उपविभागीय कार्यालयातील प्रशिक्षणार्थी कर्मचार्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले. सहकारनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये आशिष क्षीरसागर (वय २५ वर्षे) याच्यावर विलंबाने गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदाराने त्यांच्या आईच्या नावे सदनिका खरेदी केली होती; मात्र वीजदेयक मूळ मालकाच्या नावावर होते. वीजदेयकावर आईचे नाव लावण्यासाठी तक्रारदार धनकवडी येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात गेले असतांना प्रशिक्षणार्थी कर्मचारी क्षीरसागर यांनी १ सहस्र रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती ८०० रुपये लाच देण्याचे ठरले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कर्मचार्याला कह्यात घेतले. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिका
|