महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाविषयीच्या प्रतिक्रिया !
समोर कुणीही असले, तरी लढणे हा धर्म असतो. – सुषमा अंधारे, ठाकरे गट
जनतेने घराणेशाहीला झिडकारत लोकशाहीला कौल दिला. त्यामुळे लोकशाहीचा विजय झाला. – आशिष शेलार, भाजप
आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही – अमित ठाकरे
आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही; एक नवी सुरुवात आहे. तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी, माहिम, दादर, प्रभादेवी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी, मी झटत राहीन, हा माझा शब्द आहे. – अमित ठाकरे, मनसे
महाराष्ट्राच्या जनतेचा आमच्यावर विश्वास ! – सौ. अमृता फडणवीस (उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी)
ज्याप्रकारे भाजपने आणि महायुतीने आघाडी घेतली, त्यावरून हे स्पष्ट होते की, महाराष्ट्राच्या जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा शाप लागला ! – रामदास कदम, शिवसेना नेते
उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शाप लागला आहे. उद्धव ठाकरे राजकारणातून नेस्तनाबूत होतील !
अपेक्षित निकाल नाही ! – आदित्य ठाकरे, ठाकरे गट
संपूर्ण महाराष्ट्राचे निकाल जसे अपेक्षित आहेत तसे मिळाले नाहीत. एकंदरीत निकालावरून महाराष्ट्राने मतदान केले कि इ.व्ही.एम्.ने मतदान केले ? हा प्रश्न आहे.
कोणत्याही निवडणुकीत विरोधी पक्षाला एवढे मतदान झाले नाही ! – एकनाथ खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस
माझ्या स्वतःच्या गावात चंद्रकांत पाटील यांना ५५० मते मिळाली आहेत. गेल्या ४५ वर्षांत माझ्या गावात कोणत्याही निवडणुकीत विरोधी पक्षाला एवढे मतदान झालेले नाही. त्यामुळे शंका यायला वाव आहे.
हा शिवाजी महाराजांचा विजय – उदयनराजे भोसले
महाराष्ट्रातील महायुतीचा विजय हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा विजय आहे. महाविकास आघाडीने राजकारण विसरून जावे. शरद पवार यांनी यापूर्वी जी पेरणी केली, तसेच त्यांच्यासोबत घडले.
निकालामध्ये प्रचंड घोळ – रोहिणी खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
आजच्या निकालामध्ये प्रचंड घोळ दिसत आहे समोरच्या उमेदवाराला ज्या गावात प्रचाराला साधी माणसेही उपलब्ध नव्हती, त्या ठिकाणी प्रचंड मताधिक्य दिसत आहे.
भाजप सदस्यांचा ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये शिरण्याचा प्रयत्न – रोहित पवार
मध्यरात्री २५-३० भाजप कार्यकर्त्यांनी ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी केला.
कलाक्षेत्रातील प्रतिक्रिया !
धर्मो रक्षति रक्षित: हिंदू ऐक्य चिरायू होवो – प्रसाद ओक, अभिनेता
‘जो हिंदू हित की बात करेगा… वहीं देश पर राज करेगा…!!!’ ”धर्मो रक्षति रक्षित: हिंदू ऐक्य चिरायू होवो”, असे प्रसाद ओकने लिहिले आहे.
हिंदुद्वेषी अभिनेत्री स्वरा भास्कर यांच्या इव्हीएमविषयी गंभीर शंका उपस्थित !
‘संपूर्ण दिवसभर मतदान झालेल्या मशीनची बॅटरी ९९ टक्के कशी चार्ज असू शकते? सर्वच ९९ टक्के चार्ज बॅटर्या भाजप आणि मित्रपक्षांना मते का देतात?