Victory Of Hindus Power : हिंदूंनी एक बोट दाबलं, तर सरकार आलं; वज्रमूठ केली, तर हिंदु राष्ट्र निश्‍चित ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदूंच्या संघटित शक्तीचा विजय झाला !

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी झालेली चूक सुधारून हिंदूंनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडत मतदान केले. परिणामी राज्यात पुन्हा हिंदुत्वनिष्ठ सरकार सत्ता स्थापन करत आहे. हा ‘व्होट जिहाद’चा पराभव असून हिंदूंच्या संघटित शक्तीचाच विजय आहे, हेच दिसून येते. आज हिंदूंनी एक बोट दाबले, तर सरकार आले. जर हिंदूंनी मिळून वज्रमूठ केली, तर हिंदु राष्ट्र का येणार नाही ? निश्‍चितच हिंदु राष्ट्र येईल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.

समितीने म्हटले आहे की,…

१. ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चे प्रवक्ते मौलाना सज्जाद नोमानी यांनी १७ कलमी मागणीपत्र महाविकास आघाडी सरकारला दिले होते आणि काँग्रेसने ते पत्र स्वीकारल्याने सर्व मुसलमानांनी महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन नोमानी यांनी केले होते. या १७ मागण्यांमधील एक मागणी म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणणे ही होती. यासह अन्य मागण्याही हिंदुविरोधी होत्या.

२. महाराष्ट्रात हिंदूंच्या सुरक्षेवर आघात होणार होता, तो आघात हिंदूंनी मतपेटीच्या माध्यमातून उलथवून लावला आहे. देशात आणि राज्यात हिंदूंच्या सुरक्षेसाठी हिंदुहिताचे सरकार हिंदूंनी निवडून दिले आहे.

३. महाराष्ट्रात सुराज्य आणण्यासाठी संस्कृतीनिष्ठ, सुरक्षितता आणि समृद्धी यांना प्राधान्य देणार्‍या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन समितीने ‘सुराज्य अभियाना’द्वारे केले होते.


हे ही वाचा → #VoteForSurajya : आपले एक मत महाराष्ट्रात सुराज्य आणू शकते ! – सुराज्य अभियान


हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक –

४. अनेक हिंदु संघटनांनी मतदान जागृती मोहिमा राबवल्या होत्या. परिणामी हिंदु मतदार मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडला, मतदानाची टक्केवारीही वाढली आणि राज्यात हिंदुत्वनिष्ठ अन् राष्ट्रनिष्ठ विचारांचे सरकार बहुमताने आले. यासाठी अनेक साधू-संत, हिंदुत्वनिष्ठ संघटना, आध्यात्मिक संस्था, सामाजिक संस्था आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांनी संघटितपणे मेहनत घेत जागृती केली होती. त्यामुळे हा हिंदूंच्या संघटित शक्तीचा विजय आहे. या विजयासाठी आम्ही आगामी हिंदुत्वनिष्ठ सरकारचे अभिनंदन करत आहोत.