विवाहाच्या निमित्ताने इतरांना सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ किंवा सात्त्विक उत्पादने भेट द्या !
वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
विवाह समारंभात एकमेकांना भेटवस्तू देण्याची प्रथा असते. आप्तेष्टांच्या विवाह समारंभाला गेल्यावर त्यांना कपडे, भांडी आदी वस्तू भेट स्वरूपात दिल्यास काही वेळा तेही पुन्हा भेटवस्तू (‘रिटर्न गिफ्ट’) देतात.
१. इतरांना भेट देण्याचा सर्वाेत्तम पर्याय म्हणजे सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ !
सनातनने अध्यात्मशास्त्र, साधना, आचारधर्म, बालसंस्कार, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती आदी विषयांवरील ग्रंथसंपदा प्रसिद्ध केली आहे. त्यातील ग्रंथ आणि लघुग्रंथ आप्तेष्टांना भेट दिल्यास अधिकाधिक जणांपर्यंत अमूल्य ज्ञान पोचेल.
विवाह समारंभात भेट देण्यासाठी उपयुक्त असलेले विविध ग्रंथ आणि लघुग्रंथ यांची नावे पुढील सारणीत दिली आहेत. ‘कोणकोणत्या भाषांमध्ये ते ग्रंथ उपलब्ध आहेत ?’, हे त्या पुढील भाषांच्या रकान्यांत Ô अशी खूण केली आहे.
१ अ. ग्रंथ
१ आ. लघुग्रंथ
इतरांना भेट म्हणून देण्यासाठी ५०० मोठे ग्रंथ किंवा १ सहस्र लघुग्रंथ हवे असतील, तर त्या सर्व ग्रंथांच्या पहिल्या पृष्ठावर ‘…. यांच्याकडून सप्रेम भेट !’ अशा आशयाचे लिखाण छापून देता येईल.
१ इ. वरील ग्रंथ आणि लघुग्रंथ यांच्या वाचनामुळे आप्तेष्टांना हिंदु धर्मात सांगितलेले विवाहाचे शास्त्र, तसेच अलंकार, मेंदी, रांगोळी, आचारधर्म या संदर्भातील माहिती अवगत होईल.
२. सनातनची सात्त्विक आणि दर्जेदार उत्पादने
सनातनने उदबत्ती, भीमसेनी कापूर, अष्टगंध, कुंकू, दंतमंजन, साबण, उटणे, शिकेकाई चूर्ण आदी नित्योपयोगी उत्पादनांची निर्मिती केली आहे. त्याचप्रमाणे गोमूत्र-अर्क, त्रिफळा चूर्ण आदी शुद्ध आयुर्वेदीय उत्पादनेही उपलब्ध केली आहेत. विवाहाच्या निमित्ताने ही उत्पादने इतरांना भेट देऊ शकता. सनातनची सात्त्विक उत्पादने इतरांना भेट देतांना त्यासाठी सात्त्विक आणि आकर्षक भेटपेटी उपलब्ध आहेत. ही उत्पादने या भेटपेटीमध्ये घालून भेट देऊ शकता. एका भेटपेटीचे मूल्य ३० रुपये आहे.
३. वितरकांकडे ग्रंथ, लघुग्रंथ वा उत्पादने यांची मागणी करा !
नामकरण विधी, वाढदिवस, विवाहाचा वाढदिवस, वास्तूशांत आदी कार्यक्रमांच्या निमित्तानेही सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ वा उत्पादने भेट स्वरूपात देता येतील, तसेच या ग्रंथांच्या व्यतिरिक्त अन्य ग्रंथही उपलब्ध आहेत. त्यांची मागणी करायची असल्यास स्थानिक वितरकांशी लवकरात लवकर संपर्क साधावा. हे ग्रंथ आणि लघुग्रंथ https://sanatanshop.com या संकेतस्थळावरून घरबसल्याही खरेदी करू शकतो.
सनातनची ग्रंथसंपदा
सनातनच्या ऑक्टोबर २०२४ पर्यंत ३६६ ग्रंथांच्या १३ भाषांत ९७ लाख ७२ सहस्र प्रती प्रसिद्ध झाल्या आहेत.
साधकांनी वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना संपर्क करून विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ अन् उत्पादने भेट म्हणून देण्यासाठी प्रवृत्त करावे. |