बांगलादेशी-रोहिंग्या घुसखोरांवर कडक कारवाई करून त्यांना मतदान प्रक्रियेपासून रोखावे !

‘सिव्हिल सोसायटी ऑफ महाराष्ट्र’चे प्रमुख सुरेश चव्हाणके यांचे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना निवेदन !

रोहिंग्याघुसखोरांकडे अनेकदा बनावट ओळखपत्रे असल्याचे निष्पन्न झालेले आहे ( प्रतीकात्मक छायाचित्र )
श्री. सुरेश चव्हाणके

‘सध्या महाराष्ट्रात अनुमाने ८० लाख ते १ कोटी घुसखोर बेकायदेशीरपणे वास्तव्य करत आहेत. ते स्थानिक जनजीवनावरच परिणाम करत नाहीत, तर राज्याच्या लोकशाही प्रक्रियेलाही गंभीरपणे बाधा आणत आहेत. घुसखोरांवर तातडीने कडक कारवाई न केल्यास महाराष्ट्राच्या निवडणूक प्रक्रियेवर गंभीर परिणाम होईल. त्यामुळे घुसखोरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशा मागणीचे निवेदन ‘सिव्हिल सोसायटी ऑफ महाराष्ट्र’चे प्रमुख, तसेच ‘सुदर्शन न्यूज’ या हिंदी वृत्तवाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय वर्मा यांना दिले. (असे निवेदन का द्यावे लागते ? पोलीस प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ? – संपादक)

श्री. चव्हाणके यांनी निवेदनात म्हटले आहे की…,

१. घुसखोरांच्या सहभागामुळे बोगस (खोट्या) मतदानाच्या घटना वाढत असून लोकशाही प्रक्रिया कमकुवत होत आहे.

२. घुसखोरांच्या मोठ्या संख्येमुळे राज्य आणि देश यांच्या अंतर्गत अन् बाह्य सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

३. घुसखोरांमुळे स्थानिक लोकसंख्येचे संतुलन बिघडत असून सांस्कृतिक-सामाजिक समस्या निर्माण होत आहेत.’