Maharashtra Against VOTE JIHAD : ‘व्होट जिहाद’ला हिंदूंचे जोरदार प्रत्युत्तर; महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट बहुमत !
मुंबई – लोकसभेच्या निवडणुकीत मुसलमानबहुल भागांत महायुतीच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी मुसलमानांची एकगठ्ठा मते पडल्याचा प्रकार उघड झाला होता; मात्र विधानसभेच्या निवडणुकीत याला छेद देत ‘व्होट जिहाद’ला हिंदूंनी जोरदार प्रत्युत्तर दिले. भरभरून मतदान करत हिंदूंनी महायुतीला स्पष्ट बहुमत दिले. विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी महायुतीच्या निवडून आलेल्या २२४ जागा या महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या राजकारणाच्या इतिहासातील महायुतीचे सर्वाधिक बहुमत ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक है, तो सेफ है’ (एकत्र असलो, तर सुरक्षित राहू) आणि ‘उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ (विभाजित झालो, तर कापले जाऊ) या आवाहनाला हिंदूंनी भरघोस प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट झाले. याउलट महाविकास आघाडीचा राज्यात दारूण पराभव झाला आहे.
महाराष्ट्रात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी महायुती म्हणून निवडणूक लढवली, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांनी महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवली होती. विविध मतचाचण्यांवरून लावलेल्या अनुमानापेक्षा या निवडणुकीत महायुतीने मोठे आणि ऐतिहासिक यश प्राप्त केले. शिवसेनेचे विभाजन झाल्यावर ‘मतदार एकनाथ शिंदे यांच्या पारड्यात मते टाकतील कि उद्धव ठाकरे यांना समर्थन देतील ?’, तसेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून मतदार शरद पवार कि अजित पवार यांनी पाठिंबा देतील ?’, या प्रश्नांना जनतेने मतदानातून उत्तर दिले आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांविषयी असलेली सहानुभूतीची लाट ओसरल्याचे या निवडणुकीत दिसून आले.
shivHindus’ strong response to ‘Vote J|h@d’; MahaYuti achieves a clear majority in Maharashtra!
Impact of Hindu Votes Evident on Election Results!#मोदी_है_तो_सेफ_है
महाराष्ट्र विधानसभा चुनाव#MaharashtraElection2024
PC: @PoliticalKida pic.twitter.com/VLeqZShZOi— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 23, 2024
मतदानावर हिंदूंच्या मतांचा प्रभाव !
लोकसभेच्या निवडणुकीत मालेगाव, धुळे, मुंबई आदी जिल्ह्यांतील १४ मतदारसंघांमध्ये मुसलमानांची एकगठ्ठा मते महाविकास आघाडीला मिळाली होती; मात्र या विधानसभेच्या निवडणुकीत हिंदूंच्या मतांचा प्रभाव दिसून आला.
फेक नॅरेटिव्ह वर ‘एक है, तो सेफ है’ची मात !
लोकसभा निवडणुकीत ‘भाजप देशात बहुमताने आल्यास राज्यघटना पालटेल’, असे महाविकास आघाडीकडून ‘फेक नॅरेटिव्ह’ (खोटे कथानक) पसरवण्यात आले होते. त्याचा फटका महायुतीला बसला होता. विधानसभेच्या निवडणुकीत याचा फटका बसू नये, यासाठी महायुतीकडून राज्यात ‘संविधान जागृती’ अभियान राबवले. या निवडणुकीत ‘एक है, तो सेफ है’ (एकत्र असलो, तर सुरक्षित राहू) आणि ‘बटेंगे तो कटेंगे’ (विभाजित झालो, तर कापले जाऊ) या आवाहनांनी ‘फेक नॅरेटिव्ह’वर मात केली.
विकासाचा विजय ! सुशासनाचा विजय ! – पंतप्रधान मोदी
‘विकासाचा विजय ! सुशासनाचा विजय !
विकासाचा विजय!
सुशासनाचा विजय!
एकजुट होऊन आपण आणखी मोठी भरारी घेऊ.
रालोआला ऐतिहासिक जनादेश दिल्याबद्दल माझ्या महाराष्ट्रातील बंधू आणि भगिनींचे , विशेषतः राज्यातील युवक आणि महिलांचे मनःपूर्वक आभार. हे प्रेम आणि जिव्हाळा अतुलनीय आहे.
जनतेला मी ग्वाही देतो की…
— Narendra Modi (@narendramodi) November 23, 2024
एकजुट होऊन आपण आणखी मोठी भरारी घेऊ. आम्हाला ऐतिहासिक जनादेश दिल्याबद्दल माझ्या महाराष्ट्रातील बंधू आणि भगिनींचे, विशेषतः राज्यातील युवक आणि महिलांचे मनःपूर्वक आभार ! हे प्रेम आणि जिव्हाळा अतुलनीय आहे. जनतेला मी ग्वाही देतो की, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आमची आघाडी यापुढेही काम करत राहील.’
अडीच वर्षांच्या कामामुळे जनतेचे भरभरून मतदान ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
मुंबई – लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके ज्येष्ठ, लाडके शेतकरी आदी समाजातील सर्व घटकांनी महायुतीला भरभरून मतदान केले. अडीच वर्षांमधील महायुतीच्या कामाची ही पोचपावती आहे. जनतेच्या विश्वासामुळे आमचे दायित्व वाढले आहे. येत्या काळात जोमाने काम करू.
मुख्यमंत्रीपदाचा निर्णय एकत्रित घेऊ !
‘ज्यांच्या जागा अधिक, त्यांचा मुख्यमंत्री’, असे ठरलेले नाही. मुख्यमंत्रीपदासाठी एकत्रित निर्णय घेऊ’, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
राज्यातील प्रमुख विजयी उमेदवार !
१. श्री. एकनाथ शिंदे (शिवसेना)
२. श्री. देवेंद्र फडणवीस (भाजप)
३. श्री. अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)
४. श्री. मंगलप्रभात लोढा (भाजप)
५. श्री. भरतशेठ गोगावले (शिवसेना)
६. श्री. अतुल भोसले (भाजप)
प्रमुख पराभूत उमेदवार !
१. पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)
२. बाळासाहेब थोरात (काँग्रेस)
३. बच्चू कडू (प्रहार)
आम्ही आधुनिक अभिमन्यू; चक्रव्यूह भेदला ! – देवेंद्र फडवणीस
आम्ही सांगितले होते की, आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत आणि (विरोधकांनी रचलेला) चक्रव्यूह आम्ही भेदला. जे विरोधी पक्षाचे लोक निवडून आलेले आहेत, त्यांचा आम्ही सन्मान करू. लोकसभेच्या निवडणुकीत जो फेक नॅरेटिव्ह (खोटे कथानक) सिद्ध करण्यात आले होते, त्याच्या विरोधात लढणार्या सर्व संघटनांचा हा विजय आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी ‘एक है तो सेफ है, मोदी है तो मुमकिन है’, (एकत्र असलो, तर सुरक्षित राहू, मोदी असतील, तर शक्य आहे) अशा आशयाचे ट्वीट केले आहे.
एक है तो ‘सेफ’ है !
मोदी है तो मुमकिन हैं ! #Maharashtra #महाराष्ट्र— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 23, 2024
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ महायुतीच्या सरकारचा ‘शिल्पकार’ !
लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या २ दिवस आधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी ‘आता आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आवश्यकता नाही’, असे वक्तव्य केले होते. त्याचा परिणाम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते निवडणुकीच्या प्रसारात सक्रीय झाले नाहीत. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मात्र भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात समन्वयकाची नियुक्ती केली होती. राज्यात हिंदुत्वनिष्ठ उमेदवारांना मतदान व्हावे, यासाठी संघाचे सहस्रावधी कार्यकर्ते कार्यरत होते. त्यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येण्यासाठी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ शिल्पकार ठरला आहे.
२५ नोव्हेंबर या दिवशी वानखेडे स्डेडियम येथे शपथविधी होणार !
मुंबई – महाराष्ट्रातील नव्या सरकारचा शपथविधी २५ नोव्हेंबर या दिवशी येथील वानखेडे स्डेडियम या ठिकाणी होणार असल्याचे ठरले आहे. या कार्यक्रमाच्या दृष्टीने सिद्धतेला प्रारंभ करण्यात आल्याचे समजते.
शपथविधीच्या वृत्तासह ‘आता मुख्यमंत्री कोण होणार ?’, याची सर्वांना उत्सुकता आहे. त्यादृष्टीने चर्चा होत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाची शिफारस अनेकांकडून केली जात आहे. बहुमत मिळालेल्या भाजपचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार कि आताप्रमाणे एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील आणि फडणवीसांसह अजित पवार उपमुख्यमंत्री रहातील, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.