अहिल्‍यानगर येथे एस्.टी. बसमधील शेवटच्‍या आसनाखाली नोटांचे बंडल सापडले !

दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती एस्.टी. !

नोटांचे बंडल सापडले ती बस

अहिल्‍यानगर – येथे एका एस्.टी. बसच्‍या आसनाखाली प्रवाशाला ५०० रुपयांच्‍या नोटांची २ बंडले आढळून आली. कोपरगाव येथील ही घटना असून एस्.टी. आगार आणि पोलीस घटनेचे अन्‍वेषण करत आहेत. बसमधून प्रवास करणार्‍या युवकाने प्रामाणिकपणाने वाहकाकडे नोटांची बंडले सुपूर्द केली. मतदानाच्‍या दुसर्‍या दिवशी ही रक्‍कम सापडली. ही रक्‍कम कुणाची आहे ? कोणत्‍या कामासाठी ती बसमधून नेण्‍यात येत होती ? याचेही अन्‍वेषण करण्‍यात येईल.

मतदानाच्‍या एक दिवस अगोदर हीच बस ‘स्‍ट्राँग रूम’पासून इ.व्‍ही.एम्. यंत्र आणि कर्मचार्‍यांना घेऊन मतदान केंद्रावर गेली होती. त्‍यानंतर याच बसने कोपरगाव-वैजापूर-कोपरगाव अशा फेर्‍या केल्‍या आहेत.