भाजपच्या आमदार फोडाफोडीमुळे आमदारांना स्थलांतरित करण्याची सिद्धता चालू ! – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
नागपूर – विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांना तातडीने स्थलांतर करण्याची सिद्धता आमची आहे. भाजपने राजकीय व्यवस्थेत आमदार फोडण्याची पद्धत चालू केली आहे. त्यामुळे आम्ही सतर्कतेने सर्व ठिकाणी लक्ष ठेवून आहोत, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येथे माध्यमांशी बोलतांना दिली. ‘अपक्ष उमेदवारांसमवेतही आमचा संपर्क चालू आहे. लढत थोडी कठीण झाल्यास हरियाणा राज्यात घातला तसा घोळ भाजप येथे घालण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी स्वतः उद्या सर्व उमेदवारांशी बोलणार आहे’, असेही ते म्हणाले.