महाराष्‍ट्रात २८८ पैकी केवळ ६ मतदारसंघांत ८० टक्‍क्‍यांहून अधिक मतदान !

मुंबई – महाराष्‍ट्र विधानसभेसाठी मतदान झालेल्‍या २८८ पैकी केवळ ६ मतदारसंघांमध्‍ये ८० टक्‍क्‍यांहून अधिक मतदान झाले. यामध्‍ये करवीर (कोल्‍हापूर) – ८४.९६, कागल (कोल्‍हापूर) – ८२.११, सिल्लोड (नाशिक) – ८०.०८, चिमूर (चंद्रपूर) – ८१.९५, ब्रह्मापुरी (चंद्रपूर) – ८०.५४ आणि नवापूर (नंदुरबार) येथे ८१.१५ टक्‍के मतदान झाले. राज्‍यात ३ मतदारसंघांमध्‍ये ५० टक्‍क्‍यांहून कमी मतदान झाले. यामध्‍ये कुलाबा (मुंबई) – ४४.४४, मुंबादेवी (मुंबई) – ४८.७६ आणि अंबरनाथ (ठाणे) – ४८.९९ टक्‍के यांचा समावेश आहे.