दैनिक ‘सनातन प्रभात’ ने लगेच वस्तुस्थिती समाज समोर आणली ! – रावसाहेब देसाई, राष्ट्राध्यक्ष, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
सरोज पाटील यांनी पू. भिडेगुरुजी यांच्यावर केलेल्या टीकेचे प्रकरण
शिरोळ (जिल्हा कोल्हापूर) – पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या संदर्भात सरोज पाटील यांनी जे चुकीचे वक्तव्य केले आहे त्या संदर्भात दैनिक ‘सनातन प्रभात’ने याची लगेच नोंद घेऊन अग्रलेख लिहून पू. गुरुजींचे कार्य आणि वस्तूस्थिती समाजासमोर आणली. अन्य दैनिके ही राजकीय हेतूने प्रेरीत असल्याने त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही, असे मत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रावसाहेब देसाई यांनी व्यक्त केले.
पू. भिडे गुरुजींविषयी खासदार शरद पवार यांच्या भगिनी आणि दिवंगत शेतकरी कामगार पक्षाचे कॉ. एन्.डी. पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील यांनी एका जाहीर सभेत अश्लाघ्य भाषेत टीका केली. त्याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’ने लिहलेल्या अग्रलेखाचा अंक श्री. रावसाहेब देसाई यांना भेट देण्यात आला. या वेळी हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे शिरोळ तालुका समन्वयक श्री. भगवंतराव जांभळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय घाटगे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री. सुमंत रत्नपारखी उपस्थित होते.