प.पू. भक्तराज महाराज यांच्या निर्वाण दिनाच्या निमित्ताने कांदळी (जिल्हा पुणे) येथील आश्रमात विशेष कार्यक्रम
जुन्नर – प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही इंदूर (मध्यप्रदेश) येथील थोर संत आणि सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचा महानिर्वाण दिन २४ नोव्हेंबर म्हणजे कार्तिक कृष्ण नवमी या दिवशी आहे. या निमित्ताने २३ आणि २४ नोव्हेंबर या दिवशी श्री रामचंद्र देव ट्रस्ट एवं प.पू. भक्तराज महाराज समाधी ट्रस्ट यांच्या वतीने पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील कांदळी येथील आश्रमात २३ आणि २४ नोव्हेंबर या दिवशी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
२३ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ९ ते ११ या कालावधीत प.पू. भक्तराज महाराज यांच्या समाधीची नित्य नैमित्तिक पूजा केली जाईल. त्यानंतर महाप्रसाद असेल. दुपारी ३ ते सायंकाळी ७ या कालावधीत प.पू. भक्तराज महाराज यांच्या पादुकांची मिरवणूक असेल. रात्री ह.भ.प. चैतन्य दिवाकर सहस्रबुद्धे यांचे ‘सद़्गुरु भक्ती’ या विषयावर कीर्तन असेल. त्यानंतर प.पू. भक्तराज महाराज लिखित भजनांचा कार्यक्रम असेल. २४ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ९ ते ११ या कालावधीमध्ये प.पू. भक्तराज महाराज यांच्या समाधीस अभिषेक घालून नंतर पूजा केली जाईल.