प्रत्येक भारतियाने ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट पाहिला पाहिजे ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
उत्तरप्रदेश आणि गोवा यांच्यासह ७ भाजपशासित राज्यांत चित्रपट करमुक्त !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) / पणजी (गोवा) – गुजरातमध्ये वर्ष २००२ मध्ये गोध्रा रेल्वे स्थानकावर आलेल्या ‘साबरमती एक्सप्रेस’मधील कारसेवकांनी भरलेल्या डब्याला मुसलमानांनी आग लावली होती. यात ५८ कारसेवकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. याच ग्रोधा हत्याकांडावर आधारित ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट १५ नोव्हेंबरला देशभरात प्रसारित झाला. हा चित्रपट पाहिल्यावर उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, प्रत्येक भारतियाने हा चित्रपट पाहिला पाहिजे आणि गोध्रा घटनेसंबंधीचे सत्य जाणून घेतले पाहिजे.
१. हिंदी चित्रपट अभिनेते विक्रांत मॅसी यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट आता ७ भाजपशासित राज्यांत करमुक्त करण्यात आला आहे. उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही नुकतीच यासंदर्भात घोषणा केली. त्यामुळे आता हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि गुजरात या राज्यांसह उत्तरप्रदेश अन् गोवा येथेही हा चित्रपट करमुक्त झाला आहे.
२. उत्तरप्रदेश सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले की, लक्ष्मणपुरी येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह कॅबिनेट मंत्र्यांनी या चित्रपटाचा विशेष खेळ पाहिला.
३. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या प्रसंगी म्हणाले की, मी ‘साबरमती रिपोर्ट’च्या संपूर्ण चमूचे अभिनंदन करतो. त्यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून सत्य देशाच्या जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. या वेळी अभिनेते विक्रांत मॅसी आणि अभिनेत्री राशी खन्ना यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.
४. हा चित्रपट एकता कपूर निर्मित असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे.
‘द साबरमती रिपोर्ट’च्या माध्यमातून २२ वर्षांनी का होईना, गोध्रा हत्याकांडाचे सत्य जगासमोर आले ! – गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतया चित्रपटाचा खेळ गोव्यातील भाजपचे मंत्री, आमदार आणि कार्यकर्ते यांच्यासह स्वत: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एकत्रित पाहिला. या प्रसंगी सावंत म्हणाले की, या चित्रपटासाठी कार्य करणार्या सर्वांचे आणि सर्व कलाकारांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो. वर्ष २००२ मध्ये ग्रोध्रा हत्याकांड घडले. त्याचे सत्य आज २२ वर्षांनी का होईना, ‘द साबरमती रिपोर्ट’च्या माध्यमातून जगासमोर आले आहे, हे महत्त्वपूर्ण आहे. सर्वांनी हा चित्रपट पाहिला पाहिजे. |