सेवेची तळमळ असणारी आणि साधकांना सेवेत साहाय्य करणारी फोंडा (गोवा) येथील कु. वैदेही राजेंद्र शिंदे (वय ३१ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्या कु. वैदेही शिंदे यांचा २३.११.२०२४ (कार्तिक कृष्ण अष्टमी) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्याकडून कोची (केरळ) येथील साधिका सुश्री प्रणिता सुखटणकर यांना शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
कु. वैदेही शिंदे यांना ३१ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
१. हसतमुख : ‘कु. वैदेही हसतमुख असल्याने ती सेवा करत असलेल्या विभागात पुष्कळ हलकेपणा जाणवतो. ती सर्व रुग्ण साधकांशी मोकळेपणाने आणि आनंदाने बोलते.
२. ती तत्त्वनिष्ठ असल्याने तिला अन्य साधकांची जाणवलेली सूत्रे ती मनमोकळेपणाने सांगते.
३. साहाय्य करणे : मी कु. वैदेहीसमवेत भौतिकोपचारांशी (फिजिओथेरपीशी) संबंधित सेवा करत होते. मला या सेवेचा प्रत्यक्ष अनुभव नव्हता. वैदेहीने मला सेवा करतांना पुष्कळ साहाय्य केले. त्यामुळे मला सेवा करण्यास प्रोत्साहन मिळाले आणि माझा आत्मविश्वास वाढला.
४. तळमळ : ‘विभागात अजून काय चांगले करायला पाहिजे ?’, हे ती सुचवत असते. साधकांना अधिकाधिक लाभ होण्यासाठी ती प्रयत्न करत असते.
गुरुकृपेने मला शिकायला मिळालेली सूत्रे गुरुचरणी अर्पण करते. ‘तिचे गुण माझ्यात येऊ देत’, अशी गुरुचरणी प्रार्थना आहे.’
– सुश्री (कु.) प्रणिता सुखठणकर, कोची, केरळ. (४.११.२०२४)