देवाची आवड असलेली ५१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची आणि उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली वरळी, मुंबई येथील कु. अभिज्ञा अभिषेक मुरुकटे (वय ९ वर्षे) !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र चालवणारी पिढी ! कु. अभिज्ञा अभिषेक मुरुकटे ही या पिढीतील एक आहे !

‘कार्तिक कृष्‍ण अष्‍टमी (२३.११.२०२४) या दिवशी कु. अभिज्ञा अभिषेक मुरुकटे हिचा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त तिच्‍या आई-वडिलांच्‍या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

कु. अभिज्ञा मुरुकटे हिला नवव्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्‍या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

कु. अभिज्ञा मुरुकटे

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले 

१. सौ. अश्‍विनी अभिषेक मुरुकटे आणि श्री. अभिषेक वसंत मुरुकटे  (अभिज्ञाचे आई आणि वडील)

१ अ. वय  १ ते ३ वर्षे

सौ. अश्‍विनी मुरुकटे

१. कु. अभिज्ञा १ वर्षाची असल्‍यापासून स्‍वतःच्‍या हाताने जेवू लागली.

२. ती २ वर्षांची असतांनाच श्‍लोक आणि आरती म्‍हणायला शिकली.

३. ती रात्री झोपतांना उशीखाली दैनिक ‘सनातन प्रभात’ ठेवते. त्‍यामुळे तिच्‍यामध्‍ये पुष्‍कळ चांगले पालट घडले.

४. एकदा अभिज्ञाला ताप आला होता. त्‍या वेळी तिने वैखरीतून ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केला आणि त्‍यानंतर ती २० मिनिटांत शांत झोपली.

१ आ. वय ३ ते ५ वर्षे

१. तिच्‍यामध्‍ये ‘नीटनेटकेपणा’ हा गुण आहे. ती ३ – ४ वर्षांची असल्‍यापासून घर आणि अंगण यांतील केर काढते.

२. ती मोठ्या व्‍यक्‍तींशी आदराने बोलते.

३. तिच्‍या मैत्रिणी त्‍यांच्‍या आई-वडिलांना ‘मम्‍मी-पप्‍पा’ असे म्‍हणतात; मात्र अभिज्ञा आम्‍हाला ‘आई-बाबा’ असे म्‍हणते.

१ इ. वय ५ ते ७ वर्षे

१ इ १. देवाची आवड

१ इ १ अ. मंदिरात आरतीसाठी जाणे : आम्‍ही गावी गेल्‍यावर अभिज्ञा न चुकता गावातील दत्तमंदिरात आरतीसाठी जाते. तेव्‍हा ती तिच्‍या मैत्रिणींना समवेत घेऊन जाते. ती मंदिरातून परत आल्‍यावर सगळ्‍यांना प्रसाद देते आणि नंतर स्‍वतः प्रसाद ग्रहण करते.

१ इ १ आ. दत्तगुरूंचे चित्र घरी आणण्‍यासाठी हट्ट करणे : एकदा ‘आमच्‍या देवघरात दत्ताचे चित्र नाही’, असे अभिज्ञाच्‍या लक्षात आले. तिने पुष्‍कळ हट्ट केल्‍यावर आम्‍ही दत्तगुरूंचे चित्र आणले. तेव्‍हापासून ती नियमित दत्तगुरूंच्‍या चित्राची पूजा करते.

श्री. अभिषेक मुरुकटे

१ इ १ इ. तिच्‍या शाळेत सरस्‍वतीदेवीची मूर्ती आहे. ती नेहमी सरस्‍वतीदेवीच्‍या मूर्तीला नमस्‍कार करून वर्गात जाते. ती शाळेत जातांना श्रीरामरक्षा म्‍हणते.

१ ई. प्राण्‍यांवर प्रेम करणे : अभिज्ञा मार्गातील प्राण्‍यांवर पुष्‍कळ प्रेम करते. मार्गातील प्राणी तिच्‍या जवळ येऊन शांतपणे उभे रहातात.’

२. श्री. अभिषेक वसंत मुरुकटे (अभिज्ञाचे वडील)

२ अ. कठीण प्रसंगात देवाकडे साहाय्‍य मागणे : ‘अभिज्ञा ६ वर्षांची असतांना मी तिला तिच्‍या मैत्रिणींसह सायकल शिकवायला गेलो. तेथे माझे ५ – ६ मुलांशी भांडण झाले. तेव्‍हा अभिज्ञा रडत घरी आली आणि देवघरात जाऊन दिवा लावू लागली. त्‍याविषयी तिला तिचे आजी आणि आजोबा यांनी विचारले. तेव्‍हा तिने सांगितले, ‘‘बाबांना काही मुले मारत आहेत; म्‍हणून मी देवाजवळ साहाय्‍य मागत आहे.’’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १५.७.२०२२)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJckमार्गिकेवरही पाहू शकता.