आचारसंहितेच्या काळात महाराष्ट्रात ७०६ कोटी ९८ लाख रुपयांचे अमली पदार्थ, मद्य आणि मौल्यवान वस्तू जप्त !
मुंबई – महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये १५ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत ७०६ कोटी ९८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. यामध्ये अमली पदार्थ, मद्य, मौल्यवान वस्तू आणि पैसे यांचा समावेश आहे. आचारसंहितेच्या काळात निवडणूक आयोगाच्या ‘सी-व्हिजिल’ (C-Vigil) या अॅपवर १० सहस्र १३९ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यांमधील १० सहस्र १३४ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.
संपादकीय भूमिकासमाजद्रोह्यांना निवडणूक आयोगाचा जराही धाक वाटत नसल्यानेच ते अशा प्रकारचे कृत्य करू धजावतात. त्यातच प्रत्येक निवडणुकीत अशी मालमत्ता जप्त होऊनही संबंधित दोषींविरुद्ध काय कारवाई होते ?, हे जनतेला कळत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने अशांविरुद्ध कठोर कारवाई करून जनतेला आश्वस्त केले पाहिजे ! |