वक्फ बोर्डाच्या नावाखाली मांडकी येथील मराठा समाजाची भूमी हडप करण्याचा प्रयत्न !
शेतकर्यांचा माजी खासदार इम्तियाज जलील आणि अधिकारी यांच्यावर आरोप !
छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील मांडकी येथील मराठा समाजाच्या ६६ एकर भूमीचा वाद मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठात न्यायप्रविष्ट आहे. खंडपिठाने ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तरीही ‘वक्फ बोर्डाचे अधिकारी आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांचे कार्यकर्ते शेतकर्यांना भूमी सोडून जाण्यासाठी धमक्या देत आहेत’, असा आरोप १५ शेतकर्यांनी येथील पत्रकार परिषदेत केला आहे. पुढील ३ मासांत येथे इज्तेमा होत आहे. त्यासाठी ६६ एकर जागा रिकामी करण्यासाठी धमकावले जात आहे. १० हून अधिक तक्रारी करूनही पोलीस नोंद घेत नाहीत, असे शेतकर्यांनी सांगितले.
प्रा. पांडुरंग मांडकीकर म्हणाले की, संबंधित जागेवर मांडकी येथील मराठा समाजाच्या डक, गायकवाड, चौथे आदींचा ताबा आहे. अरुणा डक (वय ७० वर्षे) म्हणाल्या की, जागा रिकामी करण्याच्या धमक्या देतात. महिला काम करत असतांना त्यांच्यासमोर लघुशंका केली जाते. शेतातील मका चोरून नेण्यात आला. याविषयी माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, मांडकी येथील जागेशी माझा संबंध नाही. निवडणुकीमुळे मला अपकीर्त करण्यासाठी असे कुभांड रचले जात आहे. भाजप आणि छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार अतुल सावे या कुबांडाचे बोलविता धनी आहेत. आपण कुठल्याही भूमी मालकाला धमकावलेले नाही. माझ्यावरील आरोप खोटे आहेत.
संपादकीय भूमिकायावर सरकार आणि प्रशासन यांनी वेळीच नियंत्रण मिळवावे ! |