इतरांना साहाय्य करणारा ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा पनवेल, रायगड येथील कु. कृष्णा विजय तुपे (वय ९ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. कृष्णा विजय तुपे हा या पिढीतील एक आहे !

(‘वर्ष २०२४ मध्ये कु. कृष्णा विजय तुपे याची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के आहे.’ – संकलक) 

कु. कृष्णा तुपे


‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही,  उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पनवेल, रायगड येथील कु. कृष्णा विजय तुपे (वय ९ वर्षे) याची आई सौ. निलिमा विजय तुपे यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत. 

१. वय १ ते ३ वर्ष  

अ. ‘कृष्णा एक वर्षाचा असतांना ओळखीची व्यक्ती दिसल्यावर तिला हात जोडून नमस्कार करत असे.

आ. छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांचे छायाचित्र दिसले की, तो वाकून नमस्कार करत असे.

इ. त्याला कपाळावर टिळा लावणे, सात्त्विक वेशभूषा करणे इत्यादी धर्माचरणाच्या कृती करण्याची आवड होती.

२. वय ३ ते ५ वर्षे  

२ अ. धर्माचरणी : कृष्णाला कपाळावर उभा टिळा, छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे चंद्रकोर किंवा श्रीकृष्णासारखे गंध असे वेगवेगळ्या प्रकारचे टिळे लावायला पुष्कळ आवडतात.

३. वय ६ ते ८ वर्षे 

३ अ. हसतमुख असणे : कृष्णाचा चेहरा हसतमुख आहे. त्याच्याशी बोलतांना आनंद जाणवतो. त्याने खोड्या केल्या किंवा काही विनोद केला की, घरातील वातावरण हलके होते.

३ आ. मनमिळाऊ असणे : तो साधकांशी किंवा अन्य व्यक्तींशी जवळीक साधतो. तो सर्वांशी मिळून-मिसळून रहातो. तो घरी आलेल्या व्यक्तींशी स्वतःहून बोलतो. त्याच्या मनात कुणाविषयी प्रतिक्रिया नसतात.

३ इ. प्रेमभाव : घरी कुणीही आले किंवा साधक आले की, त्यांना पाणी देणे, खाऊ देणे इत्यादी कृती तो मनापासून करतो.

३ ई. इतरांना साहाय्य करणे : घरात कुणी रुग्णाईत असेल, तर त्यांचे डोके दाबून देणे, अंग दाबून देणे इत्यादी कृती तो मनापासून करतो.

३ उ. चांगल्या कृतीचे कौतुक करणे : जेवणात एखादा पदार्थ चांगला झाला असेल, तर तो लगेच कौतुक करतो. त्याला नातेवाइकांनी किंवा साधकांनी एखादा पदार्थ खायला दिला, तर तो त्याचेसुद्धा कौतुक करून समोरच्या व्यक्तीला आनंद देतो.

३ ऊ. साधनेसंदर्भात करत असलेल्या कृती  

१. तो सनातन संस्थेने आयोजित केलेल्या बालसंस्कारवर्गाला जातो.

२. कपाळाला टिळा लावणे, देवाला नमस्कार करणे, प्रार्थना करणे, नामजप लिहिणे, मोठ्यांना नमस्कार करणे, यांसारख्या कृती करतो.

३. इमारतीमध्ये कुणाला सनातननिर्मित सात्त्विक उत्पादने हवी असतील, तर तो नेऊन देतो.

४. एकदा त्याला बालसंस्कारवर्गात कुलदेवतेचा नामजप करण्यास सांगितले. तेव्हा त्याने घरी आल्यावर मला, ‘आई, आपली कुलदेवता कोणती आहे ?’ असे विचारले आणि तिचा नामजप करण्याचा प्रयत्न केला.

३ ए. अयोग्य कृती थांबवण्यासाठी प्रयत्न करणे : तो इतर मुलांना त्यांच्या आईला ‘मम्मी’ न म्हणता ‘आई’ म्हणा’, असे सांगतो.

३ ऐ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती भाव : आम्ही गोवा येथे गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवासाठी गेलो होतो. तेथे पोचल्यावर कृष्णाला झोप लागली होती. पटांगणात आमच्यासमोर गुरुदेवांचा रथ आला. तेव्हा कृष्णाला अकस्मात जाग आली आणि तो ‘गुरुदेवांचा रथ मला ओढायला जायचे आहे’, असे म्हणू लागला.

३ ओ. चुकांविषयी गांभीर्य असणे 

१. कृष्णाला त्याच्या चुकीची जाणीव करून दिली, तर तो शांतपणे ऐकून घेतो आणि त्यासंदर्भात प्रश्न विचारल्यास तो प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.

२. घरात कुणाकडून काही चूक झाल्यास तो त्वरित स्पष्टपणे सांगतो.

३. कृष्णामध्ये असलेले स्वभावदोष : चंचल असणे आणि कुणी बोलत असतांना मधेच बोलणे’

– सौ. निलिमा विजय तुपे (कु. कृष्णाची आई), खांदा वसाहत, नवीन पनवेल, जि. रायगड. (१४.४.२०२४)