रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
१. अधिवक्ता सुभाष नंदन चतुर्वेदी, वाराणसी, उत्तरप्रदेश.
अ. ‘हा आश्रम अद्भुत, विशाल आणि सुंदर आहे, तसेच आध्यात्मिक अन् धार्मिक क्रियांचे शिस्तबद्ध आणि श्रेष्ठ स्तरावरील केंद्र आहे.
आ. हा आश्रम धर्म, अध्यात्म, राष्ट्रभक्ती आणि वैदिक संस्कृती यांचा प्रेरणास्रोत आहे.
इ. येथे माझ्यात हिंदु राष्ट्राविषयीची आशा जागृत झाली आणि मला उज्ज्वल भविष्य दिसत आहे.’
२. श्री. अजीत कुमार यादव (सदस्य, सारथी साहाय्यता समिती), हजारीबाग, झारखंड.
अ. ‘माझ्या मनाला पुष्कळ शांती लाभली.
आ. एखाद्या मंदिरात जशी अनुभूती येते, तशी अनुभूती आली.’
३. श्री. जितेंद्र सिंह ठाकूर (प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय हिंदु महासभा, मध्यप्रदेश), इंदूर, मध्यप्रदेश.
अ. ‘मन अत्यंत प्रफुल्लित झाले.
आ. पूर्वीपेक्षा सात्त्विकता वाढली आहे.’
४. श्री. दीपक मेहर (बैरागढ क्षेत्राचे अध्यक्ष, धर्मरक्षक, भोपाळ), भोपाळ, मध्यप्रदेश.
अ. ‘मनाला शांती लाभली.
आ. येथील सेवाभाव, भगवंताप्रति समर्पण, येथे सेवा करणार्यांचे वर्तन अविश्वसनीय, अद्भुत आणि पुष्कळ चांगले वाटले.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : २७.६.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |