जो गुरुवरी विसंबला । तो भवसागरी तरला ।।
‘जो दुसर्यावरी विसंबला । त्याचा कार्यभाग बुडाला ।।’ या समर्थ रामदासस्वामी यांच्या श्लोकाचा आधार घेऊन मी व्यवहारातील कामे करत होतो. याविषयीचा आध्यात्मिक अर्थ ‘गुरुकृपायोगा’नुसार साधना करायला लागल्यापासून लागत आहे. परात्पर गुरु डॉक्टर (भगवंत) सर्वांचे कर्ता-करविता असल्याने मी त्यांच्यावर विसंबून राहिल्याने, म्हणजे श्रद्धा ठेवल्याने माझ्या जीवनात आनंद मिळत आहे. श्री गुरूंनी माझे प्रारब्ध संपवण्यासाठी मायेत ठेवले आहे आणि ते माझ्याकडून साधना करवून घेत आहेत. देव, संत, गुरु यांच्यावर हळूहळू श्रद्धा वाढवून घेत आहेत; मात्र त्यांनी मला कशातही अडकू दिले नाही, म्हणजे विसंबून राहू दिले नाही. त्यांनी मला ईश्वरी, म्हणजे गुरुतत्त्वाशी जोडले आहे. त्यांनी माझ्याकडून एक सामान्य व्यक्ती ते संत असा साधना प्रवास करवून घेतला आहे. या विषयीचे कवितापुष्प परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञतेने अर्पण करत आहे.
जो दुसर्यावरी विसंबला । त्याचा कार्यभाग बुडाला ।। १ ।।
जो कुटुंबियावरी विसंबला । तो मायेतच अडकला ।। २ ।।
जो मायानगरीवरी विसंबला । तो प्रारब्धात अडकला ।। ३ ।।
जो समाजावरी विसंबला । त्याने देवाण-घेवाण निर्मियेला ।। ४ ।।
जो देवावरी विसंबला । त्याचा कार्यभाग झाला ।। ५ ।।
जो गुरुवरी विसंबला । तो भवसागरी तरला ।। ६ ।।
जो गुरुतत्त्वावरी विसंबला । तो मोक्षाच्या मार्गी लागला ।। ७ ।।
– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.