‘साधकत्ववृद्धी शिबिरा’साठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर साधिकांना आलेल्या अनुभूती !
१. सौ. सुवर्णा साळुंखे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ६३ वर्षे), जळगाव
१ अ. चित्रीकरण कक्षात गेल्यावर आलेल्या अनुभूती
१. ‘मला शांत वाटले आणि माझ्याकडून मनोमन कृतज्ञता व्यक्त होत होती.
२. प.पू. गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) प्रार्थना केल्यावर मला चित्रीकरण कक्षाची समोरची भिंत गुलाबी रंगाची दिसली.
१ आ. रामनाथी आश्रमातील दुसर्या मजल्यावरच्या आगाशीच्या लादीवर पाय ठेवल्यावर मला लादी पुष्कळ मऊ वाटली.
१ इ. दुसर्या मजल्यावरील भिंतीवरून हात फिरवल्यावर ‘श्वासोच्छ्वास करतांना जसे ठोके जाणवतात’, तसे ठोके जाणवले.’
२. सौ. वंदना कलोडे, वर्धा
अ. ‘आश्रमातील स्वागतकक्षात असलेल्या श्रीकृष्णाच्या चित्राचे दर्शन घेतांना मला जाणवले, ‘श्रीकृष्णाच्या सुदर्शनचक्रातून तेजतत्त्व प्रक्षेपित होत आहे आणि त्या तेजतत्त्वाचे संपूर्ण आश्रमाभोवती वलय आहे.’
आ. ध्यानमंदिरात गेल्यावर ‘श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र सतत फिरत आहे’, असे मला जाणवले. तेव्हा माझा नामजप चालू झाला.
इ. प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर मला शांत वाटू लागले.
ई. शिबिरातील तीनही दिवस मला सूक्ष्मातून विराट रूपातील प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व जाणवले.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : २१.१.२०२४)
|