झारखंडमध्ये भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता !
रांची (झारखंड) – महाराष्ट्रासमवेत झारखंड येथेही विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान झाले. या मतदानानंतर विविध संस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचणीमध्ये भाजपला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. या मतदानाचा निकाल २३ नोव्हेंबर या दिवशी लागणार आहे. राज्यात ८१ जागा आहेत. भाजपला ४५ हून अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे.