समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि मौलवी मुफ्ती सलमान अझरी यांच्यात ईशनिंदाविरोधी कायद्याविषयी चर्चा !
मुंबई – समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मौलवी (इस्लामचा धार्मिक नेता) मुफ्ती सलमान अझरी यांची भेट घेतली. या वेळी ईशनिंदाविरोधी कायदा अस्तित्वात यावा, याविषयी दोघांमध्ये चर्चा झाली. समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्र युनिटचे अध्यक्ष आणि मुफ्ती अझरी यांनी प्रेषित महंमद यांचा अपमान करणार्यांना शिक्षा देण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी केली.
अबू असीम आझमी यांनी मुफ्ती अझरी यांना सांगितले की, त्यांनी त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात नमूद केले आहे की, सत्तेत आल्यास प्रेषित महंमद यांच्या विरोधात निंदनीय टिप्पणी करणार्यांवर कठोर यूएपीए अंतर्गत गुन्हा नोंदवला जाईल.
कोण आहेत मौलवी मुफ्ती अझरी ?मौलवी मुफ्ती अझरी हे हिंदुविरोधी आहेत. फेब्रुवारी २०२४ मध्ये जुनागढ येथे प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी ते आणि त्यांच्या २ साथीदारांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. यानंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही त्यांनी टीका केली होती. त्याविषयीच व्हिडिओ प्रसारित झाल्यावर त्यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हा नोंदवण्यात आला. एका संस्थेकडून एकाच वर्षात २७ लाख रुपये घेतल्याप्रकरणीही त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला होता. |
संपादकीय भूमिकाकेवळ पैगंबराच्या अवमानाच्या विरोधात नव्हे, तर हिंदु धर्म, देवता, संत आणि संस्कृती यांचीही होणारी विटंबना रोखण्यासाठी ईशनिंदाविरोधी कायदा करणे आवश्यक आहे ! |