गोमंतकीय महिलांनो आणि मुलींनो सावधान !

आपल्‍या मनामध्‍ये एक गैरसमज आहे की, शिलाईची कला हिंदु शिंप्‍यांना तेवढी जमत नाही. पणजी शहरात अन्‍य व्‍यावसायिक शिंप्‍यांकडे आपण गेलो, तर साध्‍या ब्‍लाऊजची शिलाई न्‍यूनतम ६०० रुपये आहे, म्‍हणजे कापडापेक्षा शिलाई महाग आहे. त्‍यात जशी ‘फॅशन’ (आधुनिक प्रचलित पद्धत) तशी रक्‍कम आणखी अधिक ! चुडीदार, लेंगा आदी शिवायचे, तर आणखी बरेच पैसे मोजावे लागत आहेत. त्‍याचप्रमाणे माप देतांना मुलींना चुकीच्‍या पद्धतीने स्‍पर्श करून घेणे, ही सध्‍याची स्‍थिती एकदमच काळजी करण्‍याजोगी आहे. स्‍थानिक शिंप्‍यांपैकी चांगले कपडे शिवणारे अनेक जण आहेत. केवळ आपले डोळे उघडे हवेत. स्‍वतःचे कपडे आपण हिंदूंकडून शिवून घेतल्‍यास पैसा आपल्‍यातच राहील आणि आपल्‍या लोकांनाही रोजगार मिळेल. सध्‍या भाड्याच्‍या दुकानातून कपडे शिवणारे १-२ वर्षांमध्‍ये स्‍वतः दुकान खरेदी करत आहेत. आजच्‍या स्‍थितीला ही खरीच विचार करण्‍यासारखी गोष्‍ट नाही का ? सुंदर दिसण्‍याच्‍या स्‍पर्धेत आपण योग्‍य आणि अयोग्‍य काय ? याचा विचार करायला विसरलो आहोत का ?

– सौ. रुक्‍मा गावणेकर, गोवा.