ईश्‍वराच्‍या संतानांची (मुलांची) सेवा म्‍हणजे ईश्‍वराची पूजा !

स्वामी विवेकानंद

प्रत्‍येक पुरुष, प्रत्‍येक स्‍त्री आणि प्रत्‍येक जीव म्‍हणजे ईश्‍वराचे एक एक रूप आहे, असे समजा. तुम्‍ही कुणाला साहाय्‍य करू शकत नाही, तुम्‍ही केवळ सेवा करू शकता. तुमच्‍या सद़्‍भाग्‍याने तुम्‍हाला संधी मिळाल्‍यास ईश्‍वराच्‍या संतानांची (मुलांची) सेवा करा, प्रभूच्‍या इच्‍छेने तुम्‍ही त्‍याच्‍या एखाद्या संतानाची सेवा करू शकला, तर तुम्‍ही स्‍वतःला धन्‍य माना. ही सेवा म्‍हणजे ईश्‍वराची पूजा होय. तुम्‍ही स्‍वतःला मोठे समजू नका. सेवेची संधी इतरांना न मिळता तुम्‍हाला मिळाली याविषयी स्‍वतःला धन्‍य माना. ही सेवा म्‍हणजे ईश्‍वराची पूजा होय, ही भावना ठेवूनच सेवा करा.

– स्‍वामी विवेकानंद